वाकड येथील बंदिस्त नाल्याचा मार्ग मोकळा

नागरिकांत समाधान : स्थायी सभापती गायकवाड यांचा पुढाकार

पिंपरी – गेल्या अनेक वर्षांपासून दुर्गंधीचा त्रास सहन कारावा लागल्याने नागरिकांच्या मागणीचा विचार करून अणाभाऊ साठे नगर ते मानकर चौक येथील नाल्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचा निर्णय स्थायी समिती सभापती ममता गायकवाड यांनी घेतला. प्रशासकीय पातळीवरील सर्व सूत्रे हलवून प्रभाग क्रमांक 26 मधील या नाल्याचे भूमीपूजन करण्यात आले.
वाकड येथील अण्णाभाऊ साठे नगर ते मानकर चौक येथील नाल्याचे बंदिस्तीकरणचे भूमिपूजन समारंभात स्थायी समिती सभापती ममता गायकवाड यांच्यासह माजी नगरसेवक विनायक गायकवाड, नगरसेविका आरती चोंधे, सामाजिक कार्यकर्ते रामदास कस्पटे, सर्व सोसायटीचे पदाधिकारी, ज्येष्ट नागरिक आदी उपस्थित होते.
या नाल्यामुळे गेली अनेक वर्षे आजूबाजूच्या सोसायटीमधील नागरिकांना दुर्गंधी, अस्वच्छता आदी त्रास सहन करावा लागला. या उघड्या नाल्यामुळे येथील नागरिकांना सर्व सुयीसुविधा असूनदेखील बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागत होते. यामुळे त्यात अनेकांना डेंगू, मलेरिया यासारख्या गंभीर आजाराला देखील समोरे जावे लागले. येथील नागरिक, महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना अत्यंत त्रस्त सहन करावा लागला. याबाबत सर्व नागरिकांनी स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड व मा. नगरसेवक विनायक गायकवाड यांच्याकडे लवकरात लवकर बंदिस्त नाल्याचे काम मार्गी लावण्याची मागणी केली होती. त्यावर महापालिकेच्या 18 ऑगस्ट रोजी झालेल्या स्थायी समिती सभेत अध्यक्षा ममता गायकवाड यांनी या नाल्याच्या 1 कोटी 39 लाख 84 हजार रकमेस मंजुरी देत हे काम लवकरात लवकर करण्याचे निर्देश संबंधित विभागास दिले होते. त्यानुसार शनिवारी या कामाचे सर्वांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप काही कामानिमित्त परदेशात असल्यामुळे त्यांना या कार्यक्रमाला उपस्थिती लावता आली नाही.

What is your reaction?
2 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)