वाकड पोलिसांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार

वाकड – तीन दिवसात बेपत्ता मुलीचा शोध घेणाऱ्या वाकड पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांचा शिवसेना रहाटणी काळेवाडी विभागाच्या वतीने सन्मान करण्यात आला.

लग्नाची तारीख जवळ येत असल्याचे पाहुन आर्थिक परिस्थितीमुळे हतबल झालेली इयत्ता बारावीची परीक्षा दिलेली विद्यार्थिनी राहत्या घरातून न सांगता निघुन गेली होती. ही गोष्ट आई-वडिलांना समजल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला. मात्र, वाकड पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून तीन दिवसात मुलीला सुखरुप आई-वडिलांच्या स्वाधीन केले.

यानिमित्त शिवसेना प्रभाग प्रमुख युवराज दाखले यांच्या हस्ते पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिव व्यापारी सेना शहर प्रमुख युवराज दाखले, उपशहर प्रमुख गणेश आहेर, गणेश पाडुळे, भरत महानवर, नरसिंग माने, रविकिरण घटकार, भालचंद्र फंडतळे आदी शिवसैनिक उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)