वाकड-पुनावळे येथे तेरा अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

वाकड, (वार्ताहर) – पुनावळे आणि वाकड येथील एकूण 13 अनधिकृत बांधकामांवर जेसीबी फिरवण्यात आला. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ड क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत प्रभाग क्र. 25 मध्ये बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने 1 आर.सी.सी, 12 पत्राशेड अशा 13 बांधकामावर कारवाई करण्यात आली.

ही कारवाई कार्यकारी अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली उप अभियंता, कनिष्ठ अभियंता व बीट निरीक्षक यांच्या पथकाने केली. कारवाई महापालिकेचे 10 पोलीस, वाकड पोलीस स्टेशनचे 10 पोलीस कर्मचारी, 2 जे.सी.बी, 1 अग्निशामक वाहन, 1 रुग्णवाहिका, 5 मजूर व मनपाचे 10 कर्मचारी यांच्या साह्याने करण्यात आली.
बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने केलेल्या कारवाईमुळे या परिसरात अनधिकृत बांधकामधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)