वाकड परिसरात पथदिव्यांची मागणी

पिंपरी – वाकड रस्ता चौकात विद्युत व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना रात्री अंधाराचा सामना करावा लागतो, अशी तक्रार मानवी हक्क संरक्षण संघटनचे शहराध्यक्ष अविनाश रानवडे यांनी ग क्षेत्रीय कार्यालयाकडे केली आहे.

त्यात म्हटले आहे की, वाकड रोडवरील शिवकॉलनी आणि खिंवसरा ट्रेड सेंटर समोर विद्युत व्यवस्था नाही. रात्री अकरानंतर या रस्त्यावरील सर्व दुकाने बंद होतात. दुकाने बंद झाल्यानंतर या भागात रात्री पूर्ण अंधार असतो. रस्त्यावर विद्युत व्यवस्था नसल्यामुळे या भागात चोरीचे प्रकारही घडले आहेत. तसेच, मंगलनगर येथील आठही कॉलन्यांमध्ये एलईडी बल्ब बसवले नाहीत. हा परिसरही पूर्णपणे अंधारात असतो.

याकडे पालिकेच्या विद्युत विभागाचे दुर्लक्ष आहे. नागरिकांच्या सोयीसाठी वाकड रोडवरील शिवकॉलनी चौकात, मंगलनगरमधील कॉलन्यांमध्ये तसेच खिंवसरा ट्रेड सेंटर येथील भागात विद्युत व्यवस्था पूर्ववत करावी. त्यामुळे रात्री अपरात्री घडणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसेल, असे निवेदनात नमूद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)