वाकडी येथे महिलेचा भाजून मृत्यू

रॉकेलचा दिवा पेटवताना भडका उडाला

गायत्री यांच्या पश्‍चात दोन मुली

वाकडी – राहाता तालुक्‍यातील वाकडी येथेदिवा लावताना रॉकेलचा भडका होऊन महिलेचा भाजून मुत्यू झाला. बुधवारी रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली.

गायत्री संतोष बो-हाडे (वय 29) असेमृत महिलेचेनाव आहे. गायत्री बुधवारी रात्री 9 च्या सुमारास लाईट गेल्यामुळे दिवा पेटवत होती. दिव्यामध्ये रॉकेल भरत असताना रॉकेलचा भडका झाला. त्या भडक्‍याने गायत्री बो-हाडे गंभीररित्या भाजल्या. पेटलेल्या अवस्थेत त्यांनी आरडाओरड करत घराच्या बाहेर धाव घेतली. शेजारील नागरिक त्यांच्या मदतीसाठी धावले. गायत्री यांचेपती डाळिंब घेऊन राहाता येथे गेलेले होते. गायत्री यांना प्रवरा मेडीकल ट्रस्ट लोणी येथे उपचाराकरीता दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. लोणी पोलीस ठाण्यात अकस्मात मुत्यूची नोंद करण्यात आली. गायत्री यांच्या पश्‍चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)