वाकडी येथील विद्यालयास स्वागत कमान भेट

वाकडी – राहाता तालुक्‍यातील वाकडी येथील श्री लक्ष्मीनारायण विद्यालयास माजी विद्यार्थ्यांनी स्वागत कमान भेट स्वरुपात दिली. प्रजासत्ताक दिनी विद्यालयाचेमाजी मुख्याध्यापक के. आर. जाधव यांच्या हस्तेकमानीचेउद्‌घाटन करण्यात आले. श्री लक्ष्मी नारायण विद्यालयात 2008 साली इयत्ता दहावीत शिकलेल्या विद्यार्थ्यांनी ही स्वागत कमान दिली. हे विद्यार्थी सध्या विविध पदावर नोकरी करत आहेत. यापैकी काहींनी व्यवसायात यश मिळवलेआहे.शाळेचे काही तरी देणे लागतो या भावनेतून विद्यार्थ्यांनी शाळेस भेट देण्याचे ठरवले. त्यानुसार शाळेला स्वागत कमान देण्यात आली. याबद्दल विद्यार्थी, पालक व शिक्षक वर्गात त्यांचेकौतुक होत आहे. सरपंच डॉ.संपत शेळके, खंडेराव जाधव, गणेश कारखान्याचेसंचालक भाऊसाहेब शेळके, मुख्याध्यापक आंबेकर, मुरलीधर शेळके, विठ्ठल शेळके, संदीपानंद लहारे, बाळासाहेब शेळके,संजय शेळके, जालिंदर लांडे, गोरख कोते, हरीभाऊ गोरेस्वागत कमान देताना उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)