वाकडला सराईत चोरटा गजाआड

चिंचवड – घरफोड्या करणाऱ्या एका आरोपीला वाकड पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून 2 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

प्रतीक हिराचंद लिडकर (वय-23, रा. आदर्शनगर, दिघी), असे अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे.

-Ads-

वाकड पोलीस ठाण्याचे तपास पथक काळेवाडी परिसरात गस्त घालत असताना रेकॉर्डवरील गुन्हेगार आठवण हॉटेल समोर उभा असल्याचे समजले. तपास पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने घरफोड्या केल्याची कबुली दिली. वाकड मधील 2, मंचर आणि हिंजवडी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, उपनिरीक्षक हरीश माने, कर्मचारी प्रमोद कदम, शाम बाबा आदींच्या पथकाने कारवाई केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)