वाकडमध्ये 17 रोडरोमिओंवर कारवाई

वाकड – विनाकारण शाळा आणि महाविद्यालयाबाहेर टवाळखोरी करत उभे राहणाऱ्या 17 रोडरोमिओंवर वाकड पोलिसांनी कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड परिसरातील विविध सात महाविद्यालयाच्या आवारात ही कारवाई करण्यात आली. शाळा आणि महाविद्यालयाच्या परिसरात टवाळखोरी करुन मुलींना छेडछाड करणाऱ्या रोमियोंवर पोलिसांनी ताब्यात घेतले. समज देत त्यांना सोडून दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलीस आल्याचे पाहून काही रोडरोमियोंनी पळ काढला. ही कारवाई जेएसपीएम, बालाजी सोसायटी कॉलेज, इंदिरा कॉलेज, राजवाडे नगर येथील माने शाळा, आयबीएमअर कॉलेज आदी ठिकाणी करण्यात आली. पोलीस अधिकारी, कर्मचारी व महिला कर्मचारी यांनी दोन स्वतंत्र पथके त्यासाठी नेमण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)