वाकडमध्ये तरुणावर वार

वाकड – उघड्या जागेवर लघुशंका केल्याने झालेल्या वादातून एका तरूणावर चाकूने वार करण्यात आले. ही घटना वाकड येथे घडली.

याप्रकरणी सुहास कस्पटे (वय-28), अमरचंद्रदीप डोंगरे, प्रफुल्ल कस्पटे (सर्व रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय उत्तम वाणी (वय-32, रा. तापकीर चौक, काळेवाडी) असे जखमी झालेल्याचे नाव असून, त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास वाणी व त्याचा भाऊ विजय हे जेवण झाल्यावर आइस्क्रीम खाण्यासाठी छत्रपती चौक, कस्पटे चौक, वाकड येथे आले. त्यावेळी संजय याने मोकळ्या जागेत लघुशंका केली. या कारणावरून तिथे आलेल्या आरोपींनी बेल्ट व फायटरने मारहाण केली. भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या विजय यांच्या बोटावर चाकूने वार केले. तसेच शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)