वाकडमध्ये तरुणावर कोयत्याने वार

पिंपरी – किरकोळ कारणावरुन एका 29 वर्षीय तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले आहेत. ही घटना शनिवारी (दि. 6) रात्री आठ वाजता वाकड येथे घडली आहे.

संतोष वसंत खलसे (वय-29, रा. थेरगाव) याने भैय्या जानकर व त्याचे दोन मित्र यांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

-Ads-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष हा वाकड येथील ज्योती रुग्णालयाजवळ उभा असताना आरोपी तेथे आले व त्यांनी “तू इथे का उभा आहे’, अशी विचारणा करत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी हातातील कोयत्याने संतोषच्या डोक्‍यात वार केले व लाथा बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस पुढील तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
1 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)