वाकडमध्ये अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग

वाकड – मध्यरात्री जबरदस्तीने घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ही घटना वाकड परिसरात मंगळवारी (दि. 17) मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली.

अल्पवयीन मुलीच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रवी पाटोळे (वय 21) याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री दोनच्या पाटोळे याने पीडित मुलीच्या घराचा दरवाजा ठोठावला. मुलीच्या आईने दरवाजा उघडला.

-Ads-

पाटोळे याने आईला ढकलून दिले. घरात अल्पवयीन मुलगी झोपली होती. पाटोळे याने तिच्यासोबत अतिप्रसंग केला. घाबरलेल्या आईने आरडाओरडा केला. त्यामुळे शेजारी तात्काळ जमा झाले. पाटोळे मागील काही दिवसांपासून आपल्या मुलीला त्रास देत असल्याचे शेजाऱ्यांना सांगितले असता शेजाऱ्यांनी पाटोळे याला चांगला चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)