वाकडमध्ये अपघात ; तरुणाचा मृत्यू

चिंचवड – भरधाव वेगातील पाण्याच्या टॅंकरची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. वाकडमधील भुमकर चौकात असलेल्या हॉटेल कस्तुरी समोर ही घटना घडली.

आरिफ अल्लाऊद्दीन तांबोळी (वय-28) अशी मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरिफ हा युवक दुचाकीने जात असताना भरधाव वेगातील पाण्याच्या टॅंकरने दुचाकीला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने आरिफचा मृत्यू झाला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात टॅंकर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)