वाकड – जुन्या भांडणाच्या रागातून चौघांनी मिळून तरुणाला मारहाण केली. तसेच त्याची कार व त्याच्या मित्राच्या दुचाकीचे नुकसान केले. याप्रकरणी वाकड पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. हा प्रकार भूमकर चौक ते डांगे चौकदरम्यान काळाखडक वसाहत वाकड येथे मंगळवारी (दि. 15) रात्री साडेनऊच्या सुमारास घडला होता.

आशिष उबाळे (वय-25, रा. वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. संजय रामभाऊ पवार (वय-19), विकास गोपाळ लोखंडे (वय-21), संदीप उर्फ बाळा शांताराम भोसले (वय-25, तिघे रा. काळा खडक झोपडपट्टी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींचा एक साथीदार अद्याप फरार आहे. लखन पवार असे फरार आरोपीचे नाव आहे.

मंगळवारी (दि. 15) रात्री साडेनऊच्या सुमारास आशिष शतपावली करण्यासाठी बाहेर पडले. आशिष आणि संजय यांच्यामध्ये यापूर्वी भांडणे झाली होती. त्या भांडणाचा राग मनात धरून भूमकर चौक ते डांगे चौक या रस्त्यावर संजय याने आपल्या तीन मित्रांना बोलावून आशिषला मारहाण केली. आशिषच्या कारची आणि त्याच्या मित्राच्या दुचाकीची तोडफोड केली. घातक शस्त्रे घेऊन आशिष व त्याच्या घरच्यांना ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणातील तिघांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांचा एक साथीदार फरार आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)