वाई: स्वच्छता अभियानाने आंबेडकर अनुयायांनी केले महामानवाला अभिवादन

वाई – वाई तालुक्‍यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त महागणपती घाटावर कृष्णा नदीची स्वच्छता करून वाई तालुक्‍यातील आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी महामानवाला अभिवादन करण्यास प्रारंभ केला.

14 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता आरपीआयच्या तालुका कार्यालयासमोर वाईचे तहसीलदार अतुल म्हेत्रे, वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक- विनायक वेताळ, यांच्या शुभहस्ते, तर नगराध्यक्षा- डॉ.प्रतिभा शिंदे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष- अशोकराव गायकवाड, तालुकाध्यक्ष- श्रीकांत निकाळजे, यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छ.शिवाजी महाराज व महात्मा फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. वाईच्या किसनवीर चौकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित केलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम नगराध्यक्षा- डॉ.प्रतिभा शिंदे, उपनगराध्यक्ष- अनिल सावंत, अशोकराव गायकवाड, सतीश शेंडे, यशवंत लेले, यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. तसेच फुलेनगर, सह्याद्रीनगर, आंबेडकर नगर सोनगीरवाडी, वाई एसटी आगारात, भव्य रांगोळी काढून महामानवाला अभिवादन करण्यात आले.

अतिशय उत्साहाच्या वातावरणात आंबेडकर अनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सर्व मंडळांनी एकत्र येवून सायंकाळी सहा वाजता भव्य मिरवणूक वाई शहरातून काढण्यात आली होती. मिरवणुकीत डॉल्बीला फाटा देत, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील ग्रंथाच्या ग्रंथदिंडीसह, पारंपारिक वाद्यांचा, ढोल ताशांचा समावेश करण्यात आला होता. यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. सकाळी सात वाजल्यापासून तालुका कार्यलायासमोर महाडहून येणाऱ्या तालुक्‍यातील मंडळांनी आणलेल्या ज्योतींचे स्वागत करण्यात आले. ज्योतीं आणण्यामध्ये तरुण मुला-मुलींचा समावेश मोठ्या प्रमाणात दिसून येत होता. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छ.शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले या महान पुरुषांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यासाठी पसरणी येथे 15 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता जयभीम मित्र मंडळ व गायकवाड प्रतिष्ठानच्या वतीने प्रेरणा पुरस्कार व सन्मान सोहळा उपविभागीय पोलीस अधिकारी- अजित टिके, पोलीस निरीक्षक- विनायक वेताळ, यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजीत करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)