वाई बाजार समितीच्या सभापती पदी लक्ष्मणराव पिसाळ

वाई – नुकत्याच बिनविरोध पार पडलेल्या वाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापदी लक्ष्मणराव पिसाळ यांची निवड करण्यात आली. माजी सभापती यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ते पद रिक्त झाल्यामुळे अध्यासी अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था वाई ए. बी. थोरात यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समितीच्या वाई येथील मुख्य कार्यालयात सभापती निवडीसाठी सभा पार पडली यामध्ये सर्वानुमते लक्ष्मणराव आप्पासो पिसाळ यांची निवड करण्यात आली. त्यांना सूचक म्हणून मोहन जाधव व अनुमोदक बाजार समितीचे उपसभापती दीपक बाबर यांनी दिले.

लक्ष्मणराव पिसाळ यांच्या निवडीनंतर जिल्हा बॅंकेचे संचालक नितीन पाटील यांच्या हस्ते त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. बावधन सूतगिरणीचे चेअरमन शशिकांत पिसाळ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रतापराव पवार, पंचायत समितीच्या सभापती सौ. रजनीताई भोसले, माजी सभापती दिलीप बाबा पिसाळ, प्रमोद शिंदे, विजयसिंह नायकवडी, उपसभापती रवींद्र जाधव, मदन भोसले, माजी संचालक सुधीर गायकवाड, सातारा खरेदी-विक्री संघाचे संचालक कांतीलाल पवार, तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पिसाळ, माजी नगराध्यक्ष रमेश गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना नूतन सभापती लक्ष्मणराव पिसाळ म्हणाले, वाई कृषी उत्पन्न बाजार सामितीचा कारभार आमदार मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी सभापती मोहनराव जाधव, उपसभापती दीपक बाबर व सर्व संचालक यांचा सहकार्यानेच करण्यात येईल, बाजार समितीच्या माध्यमातून वाई तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणार असून बाजार सामितीचा कारभार हा व्यापारी व कर्मचारी यांना बरोबर घेवूनच पारदर्शक पद्धतीने करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. यावेळी जिल्हा बॅंकेचे संचालक नितीन पाटील, माजी सभापती मोहनराव जाधव, तालुकाध्यक्ष प्रतापराव पवार, यांनी मनोगत व्यक्त करीत नूतन सभापतीना सुभेच्छा दिल्या. नूतन सभापतींच्या सक्तार समारंभास व्याजवाडीतील ग्रामस्थ, बाजार समितीतील शेतकरी, व्यापारी सर्व कर्मचारी स्टाप मोठ्या संख्येने उपस्थित होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)