वाई तालुक्‍याला पेयजल योजनेसाठी 11 कोटी

भाजप जिल्हाअध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या पाठपुराव्याला यश
वाई – वाई तालुक्‍यातील 45 गावांना राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनांसाठी 11 कोटी 10 लाखांचा निधी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या माध्यमातून वाई तालुक्‍यातील पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. यामुळे वाई तालुक्‍यातील पश्‍चिम व पूर्व भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने कायमस्वरूपी मिटणार आहे.

वाई तालुक्‍यातील सर्वच भागात पिण्याच्या पाण्याच्या योजना मंजूर करून भाजप सरकारचे टॅंकर मुक्त तालुका करण्याचे प्रयत्न असल्याचे जिल्हाध्यक्ष पावसकर यांनी पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत बोलताना मत व्यक्त केले. सातारा येथील शासकीय विश्राम गृहात महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय पेयजल योजनेतून किती निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याची सविस्तर माहिती जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी उपस्थितांना दिली. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष काशिनाथ शेलार, तालुका अध्यक्ष सचिन घाटगे, जेष्ठ नेते अविनाश फरांदे, बापूसाहेब शिंदे, युवराज कोंढाळकर, आली आगा, महेश कोकरे, सचिन जमदाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

वाई तालुक्‍यातील चौदा गावांना निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये भिलरवाडी 1 लाख, विठ्ठलवाडी 8.50 लाख, व्याहळी (पुन.) 25 लाख, वेरुळी-सोमेश्वरवाडी 8.50 लाख, वेरुळी 14 लाख, आकोशी-गोवे 6.50 लाख, आनंदपूर 12.50 लाख, अनवडी-धमालवस्ती, जगदाळे वस्ती, कुंभार वस्ती, नवेगावठाण 67.75 लाख, बालेघर 42.98 लाख, भुईंज-धनगरवाडी 30 लाख, बावधन 90 लाख, भुईंज- फुलेनगर 28 लाख, बोपर्डी 85 लाख, बोपेगाव 45 लाख, चांदक 32 लाख, चिखली-मांढरेवाडी 5.80 लाख, धावडी-रेणुसेवस्ती 7 लाख, धावडी-वाघमाल 8 लाख, दह्याट 12.50 लाख, धोम 40 लाख, एकसर 33.50 लाख, गोवेदिगर 30 लाख, गुळुंब 23.50 लाख, गुंडेवाडी 30 लाख, जांभळी 25 लाख, कडेगाव 9 लाख, केंजळ 10 लाख, खडकी 40 लाख, लोहारे 20.74 लाख, मांढरदेव 23 लाख, पाचवड 85 लाख, परखंदी 48 लाख, पसरणी-कमाजीमाळ 14.34 लाख, शिरगांव 25 लाख, उलुम्ब 10 लाख, वडवली-बौद्धवस्ती 25.53 लाख, वासोळे 38 लाख, वेलंग 14 लाख, निकमवाडीसाठी 35 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

वाई तालुक्‍यातील या सर्व गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रलंबित होता, राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी वाई तालुक्‍यातील पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठांकडे पाठपुरावा केला होता. या योजनेच्या माध्यमातून वाई तालुक्‍यातील पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लागणार असून लोकांसाठी स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. थोड्याच दिवसात या स्कीमच्या कामांना सुरुवात करण्यात येणार असल्याचे तालुकाध्यक्ष सचिन घाटगे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)