वाई तालुक्‍यात सार्वजनिक ग्रंथालयाची अवस्था दयनीय

प्रभात स्पेशल : ग्रंथालय चळवळ आणि वाचनसंस्कृती

कागदोपत्री 28 ग्रंथालये,18 ग्रंथालयांचेच अस्तित्व सध्या अबाधित

वाई – वाई ही तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, देशभक्त थोर स्वातंत्र्य सेनानी किसन वीर यांचा वारसा लाभलेली भूमी. कृष्णा माईचा प्रेमळ स्पर्श, सहवास लाभलेली मराठी विश्‍वकोश, प्राज्ञपाठ शाळेची पावन भूमी, साहित्य, संस्कृती, शिक्षण, सहकार, राजकारण, असणाऱ्यांमध्ये जिल्हयातील सर्व कामांमध्ये वाई तालुका अग्रभागी असतो. अशा तालुक्‍यात ग्रंथालयांची अवस्था शहरात सोडली तर ग्रामीण भागात अनेक ठिकाणी दयनीय अवस्था झालेली दिसून येत आहे.

साहित्यांचे गाडे अभ्यासक, विचारवंत वाई तालुक्‍यातील असताना ग्रंथलयांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचे चित्र दुर्दैवाने दिसत आहे. सध्या कागदोपत्री अठ्ठावीस ग्रंथालयांना शासनाचे अनुदान मिळत असून गलथान कारभारामुळे फक्त अठरा ग्रंथालयांचे अस्तित्व अबाधित आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वाई शहरात लोकमान्य टिळक ग्रंथालय सुसज्य इमारतीत स्थिरावले आहे. वाई शहरात फुलेनगरमध्ये दोन, बावधन नाक्‍यावर एक, एकूण चार ठिकाणी ग्रंथालये आहेत, त्याच बरोबर बावधनमध्ये ग्रामपंचायतीच्या कार्यालयात, सुरूर, गुळून्ब, म्होडेकरवाडी, ओझर्डे, भुईंज, किसनवीर सहकारी साखर कारखाना, किसनवीर नगर, किकली, वहागांव, अमृतवाडी, पांडे, बोपेगांव, अशा 18 ठिकाणी ग्रंथालये चालू असून त्यांची अवस्था फारशी चांगली नाही, तर धोम पुनर्वसन, वेळे, मेणवली सह दहा ग्रामीण भागातील ग्रंथालये बंद करण्यात आली आहेत. शासन देत असलेले अनुदान योग्य पद्धतीने न हाताळता आल्याने ग्रंथालयांची अवस्था बेकार झाली आहे.

वाई तालुक्‍यात शाळा, महाविद्यालयात असणाऱ्या ग्रंथालयांची परिस्थिती अतिशय चांगली आहे. हजारो पुस्तके, ग्रंथ, मासिके त्या ग्रंथालयात वाचकांना वाचण्यासाठी मिळत असतात. वाई च्या विश्‍वकोश मध्येही अतिशय चांगली दर्जेदार लायब्ररी आहे. याचा उपयोग शोध निबंध,व साहित्यांची निर्मिती करण्यासाठी प्रामुख्याने केला जातो. ग्रामीण भागातील लोकांमध्ये दैनिक पेपर सोडले तर इतर पुस्तके वाचण्यात ग्रामस्थांना स्वारस्य दिसून येत नाही. त्यासाठी वाचनाची गोडी निर्माण होण्यासाठी प्रबोधन वर्ग राबविण्याची आज नितांत गरज आहे. वाचन संस्कृती टिकली तरच ग्रंथालयांना उर्जितावस्था येण्यास वेळ लागणार नाही.

ग्रंथालये जिवंत असणे आवश्‍यक
वाई तालुक्‍यात 28 ग्रंथालये असताना आज मितीला फक्त 18 ग्रंथालये कार्यरत आहेत. दिवसेंदिवस ग्रंथालयांची संख्या कमी होत आहे. ही अतिशय गंभीर बाब असून शासनाने दिलेले अनुदान योग्य पद्धतीने न हाताळल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे.
– लोकमान्य टिळक ग्रंथालय व्यवस्थापक


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)