वाई, दि. 11 (प्रतिनिधी) – वाई तालुक्‍यातील सात ग्रामपंचायतींचा निवडणूका जाहिर झाल्या आहेत. यामध्ये यशवंतनगर, शहाबाग, वेळे, अमृतवाडी, पाचवड, चांदवडी (पुर्न.), धोम (पुर्न.) इत्यादी गावांचा समावेश असून असून अर्ज भरण्याची 11 रोजी अखेर वाई तालुक्‍यात सरपंच पदासाठी 31 तर सदस्य पदासाठी 214 अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये यशवंतनगर सरपंच पदासाठी 6 तर सदस्यपदासाठी 44, शहाबाग सरपंच पदासाठी 2 सदस्यपदासाठी 41, वेळे सरपंच पदासाठी 7 तर सदस्यपदासाठी 35, अमृतवाडी सरपंच पदासाठी 3 सदस्यपदासाठी 23, पाचवड सरपंच पदासाठी 4 तर सदस्यपदासाठी 42, चांदवडी (पुर्न.) सरपंच पदासाठी 7 तर सदस्यपदासाठी 22, धोम (पुर्न.) सरपंच पदासाठी 2 तर सदस्यपदासाठी 7, अर्ज भरले असून मतदान 26 सप्टेंबरला मतदान तर मतमोजणी 27 रोजी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)