वाई तालुक्‍यातील कॉंग्रेस मरगळ झटकणार?

विराज शिंदे यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य
सातारा, दि. 15 (प्रतिनिधी)
वाई येथील कॉंग्रेसचे युवा नेते विराज शिंदे यांची नुकतीच जिल्हा युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने तालुक्‍यातील कॉंग्रेसमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. विराज शिंदे यांच्या निवडीमुळे तालुक्‍यातील कॉंग्रेसला आलेली मरगळ झटकल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, आमदार मकरंद पाटील यांना शह देण्यासाठीची ही व्युहरचनाच असल्याचे राजकीय पटलावर बोलले जात आहे. विराज शिंदे यांच्याविषयी युवकांमध्ये क्रेझ आहेच. त्याशिवाय तालुक्‍याच्या कॉंग्रेसमध्ये त्यांच्या तोडीचा दुसरा नेताही आता राहिलेला नाही. त्याचबरोबर माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आनंदराव पाटील, माजी आमदार मदन भोसले या दिग्गज नेत्यांकडून विराज शिंदे यांना बळ दिले जात असल्याने आगामी काळात वाई मतदार संघाच्या नेतृत्वात बदल होण्याची दाट शक्‍यता वर्तविली जाऊ लागली आहे.
देशात आणि राज्याची सत्ता भाजपने काबीज केल्यापासून कॉंग्रेसला एकप्रकराची मरगळ आली आही. हीच अवस्था सातारा जिल्ह्यातही आहे. मुळातच सातारा हा पहिल्यापासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. परंतु, आमदार जयकुमार गोरेंमुळे माण-खटावमध्ये, विलासराव उंडाळकर तसेच पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे कराडामध्ये कॉंग्रेसचा झंजावात कायम आहे. तसेच वाई मतदार संघातही माजी आमदार मदन भोसले यांच्यामुळे काही कॉंग्रेसला चांगले दिवस होते, परंतु दहा वर्षांपूर्वी. राष्ट्रवादीला कंटाळलेल्या जनतेने त्यामुळे कॉंग्रेसमधून उभ्या राहिलेल्या मदन भोसले यांना बहुमताने निवडून देत मकरंद पाटील यांना धुळ चारली. मात्र, विकासकामांची कमतरता आणि जनसंपर्क न राहिलेल्यामुळे दुसऱ्याच पंचवार्षिकला मतदार संघातील जनतेने मदन भोसले यांना त्यांची जागा दाखवून देत मकरंद पाटील यांना आमदार म्हणून आपलसं केले. त्यानंतरची दुसरी निवडणुकही मकरंद पाटील यांनी जिंकली. सलग दहा वर्षे सत्ता न राहिल्याने तालुक्‍यातील विरोधी गट असलेल्या कॉंग्रेसला पुरती मरगळ आल्याची परिस्थिती निर्माण झाली असतानाच वाईत विराज शिंदे यांच्या रुपाने कॉंग्रेसला नवसंजीवनी मिळाली आहे. पंचायत समितीच्या निवडणुकीत विराज शिंदे यांच्या पत्नी ऋताजा शिंदे यांनाही जनतेने बहुमताने निवडून दिले. केवळ सदस्यपद असतानाही तालुक्‍यातील विविध ठिकाणी विकासकामे करत जनसंपर्क वाढविण्याचे काम विराज शिंदे यांनी सुरु केले. त्यांच्या कामाची पोचपोवती म्हणूनच पक्षाने जिल्हा युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांच्या खांद्यावर सोपविली आहे. विराज शिंदे यांचा दिवसेंदिवस वाढत असलेला तालुक्‍यातील जनसंपर्कामुळे तालुक्‍यातील कॉंग्रेसमध्ये पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण झाले आहे.
एकेकाळी माजी आमदार मदन भोसले यांचे निष्ठावंत असलेले कार्यकर्ते त्यांच्या कमी जनसपर्कामुळे कॉंग्रेसपासून दुरावले होते. मात्र, विराज शिंदे यांच्या निवडीमुळे कॉंग्रेसचे विस्कटलेली घडी पुन्हा नव्याने बसू लागली आहे. विराज शिंदे यांची निवड ही सत्ताधारी गटासाठी धोक्‍याचीच घंटा मानली जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)