वाई तालुक्‍यातील कालव्यांना घरघर

-पाटबंधारे विभागाचा निष्क्रिय कारभार
-दुरवस्थेमुळे लाखो लिटर पाणी वाया

धनंजय घोडके
वाई – धोम धरणाच्या उभारणीला पन्नास वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. धोम पाटबंधारे खात्याने या दीर्घ कालावधीत साधी कालव्याच्या बाजुची व अंतर्गत साफसफाई सुध्दा केली नव्हती. कालव्यांची झालेली दयनीय पाहून प्रसार माध्यमांनी अनेक वेळा पाटबंधारे खात्याच्या कारभारावर ताशेरे ओढले. पाटबंधारे खात्याने शासनाने कालव्यांच्या दुरुस्तीसाठी निधी न दिल्याचे कारण पुढे करत कालव्यांची कामे केलेली नव्हती. शेवटी धोम पाटबंधारे खात्याला जाग येवून धोम पासून पाचवडपर्यंत सुमारे सतरा किलोमीटर अंतर कालव्याच्या दोन्ही बाजूला वाढलेली झाडे-झुडपे व अंतर्गत गाळ काढण्याचे काम पूर्ण केले, परंतु कालव्यांची दुरुस्ती केली नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वाई तालुक्‍यात डावा आणि उजवा असे धरणाच्या दोन्ही बाजूने कालवे काढण्यात आले आहेत. या कालव्याव्दारे हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी ओलिताखाली येवून शेतकऱ्यांचे राहणीमान बदलले. दोन्ही बाजूच्या सोडण्यात येणाऱ्या पाण्यातून कररुपी पैसा पाटबंधारे खात्याने अनेक वर्षांपासून गोळा केला आहे. तरीही गेल्या कित्येक वर्षात संबंधित खात्याने कालव्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. पाटबंधारे प्रशासन खात्याला कालवे दुरुस्तीला मुहूर्त मिळाला नव्हता. वाई तालुक्‍यात कित्येक वेळा कालव्याला भगदाड पडून कालव्याच्या शेजारी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होवूनसुध्दा या खात्याला जाग आली नाही.

तात्पुरती डागडुजी करून गेली चाळीस वर्षे कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्याचे काम सुरू आहे. पाटबंधारे खात्याने कालव्याच्या डागडूजीच्या कामाला सुरुवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. ते काम बावधन परिसरापर्यंत आले असून पाचवडच्या शेतकऱ्यांनी कालवा सफाईच्या कामाची मागणी केली आहे. किमान पाण्याच्या जास्तीतजास्त पाणी शेतीसाठी वापरता येईल पाण्याची नासाडी कमी होण्यासाठी सहकार्य मिळेल.

अनेकवेळा झाडा-झुडपांच्या मुळ्या कालव्याच्या भगदाडाला कारणीभूत ठरतात, दोन्ही बाजूची साफसफाई केल्याने कालव्याला भगदाड पडण्यावर अंकुश मिळेल. तसेच कालव्यावर असणाऱ्या झुडपांमुळे श्‍वापदांचा त्रासही सहन करावा लागणार नाही. जीव मुठीत घेवून शेतकऱ्यांना कालव्यावरून प्रवास करावा लागत होता, त्याही अनुषंगाने साफसफाईचे काम फायदेशीर ठरणार आहे. पाटबंधारे खात्याने जसे साफसफाईचे काम हाती घेतले आहे. त्याचप्रमाणे कालवे दुरुस्तीच्या कामाला मुहूर्त शोधावा अशीही मागणी शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे. तसेच कालवा नादुरुस्तीमुळे जे दरवर्षी लाखो लिटर पाणी धरणातील वाया जाते तेही वाचण्यात मदत मिळेल.

पाण्याचा वापरापेक्षा नासाडीच जास्त
दर पंधरा दिवसांनी डाव्या आणि उजव्या कालव्यातून शेतीसाठी, पिण्याच्या पाण्यासाठी कालव्यातून पाणी सोडले जाते. पाच तालुके व तीन जिल्ह्यातील जमीन धोम धरणाच्या कालव्यातून सुटणाऱ्या पाण्यावर अवलंबून आहे. हजारो हेक्‍टर शेतीतील अन्नधान्य या पाण्यावर अवलंबून आहे. मात्र तरीही कालव्याच्या दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी गळती लागली असून पाण्याचा वापर कमी आणि नासाडीच जास्त होऊ लागली आहे.
एक लाभार्थी शेतकरी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)