वाई तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात बस थांब्यांची मागणी

शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा

वाई – वाई तालुक्‍यातील वडाचीवाडी, पाचपुतेवाडी, गणपतीमंदीर, (वडाचीवाडी) पाचपुतेवाडी फाट्यावर एसटीचा थांबा करून ग्रामस्थांची ससेहोलपट थांबवावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.

-Ads-

याबाबत अमोल कोंढाळकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, वाई तालुक्‍यातील वडाचीवाडी, पाचपुतेवाडी, गणपतीमंदीर, (वडाचीवाडी) पाचपुतेवाडी फाटा येथे एसटीचा थांबा नसल्याने या भागातील नागरिकांची मोठी अडचण होत आहे. एसटी आगाराने याची दखल घेवून एसटी थांबा बनवावा. यावेळी शिवसेना महिला आघाडी तालुका संघटिका कोमल गांधी, तालुका प्रमुख दिलीप पवार, शहरप्रमुख गणेश जाधव, किरण खामकर, अभेपुरी संघटक आशिष पाटणे, उपशहर प्रमुख अतुल भाटे, किशोर गांधी, उद्योग सहकार आघाडी तालुकाप्रमुख संतोष पोफळे, विभागप्रमुख सचिन गोळे, अनिल मांढरे, सतिश निकम, सतिश मांढरे, तेजस मांढरे, निखिल खोपडे, अमित बांदल आणि अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)