वाई तालुका सोशल मीडिया अध्यक्षपदी शशिकांत पवार

कवठे, दि. 8 (वार्ताहर) – राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी वाई तालुका सोशल मीडियाच्या अध्यक्षपदी वेळे, ता. वाई येथील शशिकांत पवार यांची निवड करण्यात आली. शशिकांत पवार हे कवठे गटातील माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. वेळे ता. वाई येथील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कॉंग्रेस गटाकडून सत्ता खेचून पुन्हा राष्ट्रवादी गटाकडे ग्रामपंचायत आणण्यात शशिकांत पवार यांचे मोलाचे योगदान आहे. या निवडणुकीमध्ये मीडिया व सोशल मीडिया यांचा यशस्वी वापर शशिकांत पवार यांनी केला होता.
आमदार मकरंद पाटील यांचे ते कट्टर समर्थक असून सोशल मीडियाद्वारे कायम जनसंपर्क ते राखतात. त्यांच्या या निवडीबद्दल माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आ. मकरंद पाटील, जिल्हा बॅंक संचालक नितीन पाटील, जिल्हा परिषद सदस्य संगीता मसकर, वाई पंचायत समिती सभापती रजनी भोसले, उपसभापती अनिल जगताप, जिल्हा राष्ट्रवादी उपाध्यक्ष महादेव मसकर, वाई पंचायत समिती सदस्य मधुकर भोसले, माजी सभापती दिलीप पिसाळ, प्रमोद शिंदे, विजय नायकवडी, सत्यजित वीर, उमा बुलुंगे, वाई सूतगिरणी चेअरमन शशिकांत पिसाळ, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दत्तात्रय पोळ, कुमार जगताप, विक्रमसिंह पिसाळ, माजी नगराध्यक्ष रमेश गायकवाड यांनी पवार यांचे अभिनंदन केले.
यावेळी शशिकांत पवार म्हणाले, आगामी काळामध्ये लोकसभा व तद्‌नंतर विधानसभा निवडणूक कार्यक्रम येत आहे. या निवडणुकीदरम्यान सोशल मीडिया महत्वाची भूमिका बजावणार असून या पदाचा वापर करून जनसंपर्क प्रस्थापित करून पक्षाची ध्येयधोरणे जनसामान्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार असून मला दिलेल्या जबाबदारीस योग्य न्याय देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)