वाई तालुका मराठी पत्रकार संघाची स्थापना

तालुकाध्यक्षपदी दौलतराव पिसाळ यांची निवड

मेणवली – पत्रकांराचे विविध प्रश्‍न सोडवणे त्यांच्या समस्यांचा निपटारा करण्याकरिता वाई तालुका मराठी पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली आहे. या संघाच्या अध्यक्षपदी ओझर्डे येथील दौलतराव पिसाळ यांची निवड करण्यात आली असून कार्याध्यक्षपदी बावधन येथील तानाजी कचरे यांची निवड करण्यात आली आहे. शहर अध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार शिवाजीराव जगताप वाई यांची निवड करण्यात आली असून तालुका पूर्व उपाध्यक्षपदी विनोद पोळ कवठे तर पश्‍चिम उपाध्यक्षपदी अनिल काटे मेणवली यांची निवड करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सचिवपदी संजय वरे कुसगाव, सहसचिव महेंद्र गायकवाड पाचवड तर खजिनदारपदी अभिनव पवार वेळे, शहर उपाध्यक्षपदी निलेश जायगुडे सिद्धनाथवाडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व निवडी जेष्ठ पत्रकार शिवाजीराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या तालुक्‍यातील पत्रकारांच्या सभेत सर्व संमतीने करण्यात आल्या.

या पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारावर होणारे हल्ले, पत्रकारिता संरक्षण, सर्व पत्रकारांना अधिस्वीकृती पत्र, जेष्ठ पत्रकारांना पेन्शन चालू करणे व मिळवून देणे, पत्रकार भवन उभारणे, पत्रकारांकरिता गृहनिर्माण संस्था उभारणे तसेच “दैनिक प्रभात’चे भुईज प्रतिनिधी समीर मेंगळे यांना वाई पोलीस ठाण्याचे स. पो. नि. बबन येडगे व इतर पोलिसांनी अमानुष केलेल्या नाहक मारहाणीबाबत जाब विचारणे, सामाजिक उपक्रमात सहभागी होवून जनतेच्या प्रश्‍नांची दखल घेवून त्या प्रश्‍नांना न्याय मिळवून देणे असे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.

हा पत्रकार संघ थेट महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषद मुंबई यांच्याशी संलग्न रहाणार असून लवकरच या परिषदेचे राज्याचे पत्रकांराचे नेते वाई तालुका मराठी पत्रकार संघाशी तालुक्‍यातील विविध प्रश्‍नांची चर्चा करण्याकरिता उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे व मार्गदर्शनामुळे संघाच्या कामकाजास गती येईल असा विश्‍वास नूतन अध्यक्ष दौलतराव पिसाळ यांनी व्यक्त केला. या निवडीच्या वेळी पत्रकार पुरुषोत्तम डेरे, दीपक मांढरे, संजय भाडळकर, नीलेश पोतदार, समीर मेंगळे, ज्ञानदेव वाशिवले, लोकवृत्त चॅनलचे बापूसाहेब वाघ यांच्यासह सर्वानुमते निवड झालेल्या सहकाऱ्यांची उपस्थिती होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)