वाई तालुका आषाढी वारीची गाढवेवाडीत सांगता

दिंडीतील कार्यक्रम सांगता समारंभातील कीर्तन कार्यक्रम (छाया : करुणा पोळ, कवठे.)

कवठे, दि. 12 (वार्ताहर) – वाई तालुका वारकरी संघटना यांच्या संत ज्ञानेश्वर महाराज वारीतील दिंडी नंबर 131 चा वारी संपल्यानंतर विणा उतरविणे या कार्यक्रमाचा मान यंदा वाई तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील गाढवेवाडी या गावाला मिळाला. या संघटनेमध्ये तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील वारकऱ्यांनी केलेल्या विनंतीस मान देवून हा कार्यक्रम गाढवेवाडी (ता. वाई) येथे यंदा घेण्यात आला. प्रतिवर्षी वेगवेगळ्या गावातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
गेली 27 वर्षे या वारकरी संघटनेच्यामार्फत दिंडी सोहळ्यामध्ये सहभाग घेतला जातो. अष्टमीला आळंदीपासून पंढरपूर येथे जाण्यासाठी या दिंडीचा प्रवास सुरु होतो व एकादशी दिवशी पंढरपूर येथे ही वारी पोहोचते. तद्‌नंतर तीन दिवसांनी गोपाळकाला झाल्यावर बावीस दिवसांचा दिंडी प्रवास संपवून या दिंडीचा परतीचा प्रवास सुरु होतो. तो पौर्णिमेच्या दिवशी दहा दिवसाचा परतीचा प्रवास करून सदर दिंडी एकादशीला पुन्हा वाई तालुक्‍यात माघारी येते. हा प्रवास 10 दिवसांचा असतो. असा एकंदरीत 32 दिवसांचा प्रवास करून सदर दिंडीचे गाढवेवाडी गावामध्ये आगमन झाले. विन्यासह उपस्थित तालुक्‍यातील वारकरी संघटनेच्या व इतर वारकरी संघटनेच्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत ग्राम प्रदक्षिणा घालण्यात आली. टाळ मृदंगाच्या निनादात विण्याची प्रदक्षिणा विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर येथे झाल्यानंतर सर्व वारकरी पुरुषांचे उपरणे व श्रीफळ देवून तर महिलांचे खणानारळाने व साड्या देवून ओटी भरण्यात आली.
या दिंडीत प्रामुख्याने संघटना अध्यक्ष भरत बागल, दिंडी अध्यक्ष अशोक पाटणे, सचिव शिवाजी चव्हाण, खजिनदार बबन संपकाळ, विणेकरी दिनेश भागवत, वैराटवासी आबानंदनगिरी दिंडीचे विणेकरी विजय पोळ, वसंत चव्हाण, विजय गाढवे, माजी अध्यक्ष हणमंतराव मांढरे, सुरेश गाढवे, शरद गाढवे, सुरज गाढवे, खजिनदार बबन सपकाळ, शिवाजी गाढवे, सूर्याजी पोळ पाटील, दत्तात्रय सावंत, बाबुराव कदम, नाना येवले, सुधाकर सावंत, मच्छींद्र महामुनी, अनिल गाढवे, संतोष येवले, सतीश चव्हाण, संतोष येवले यांचा सहभाग होता.
या सांगता कार्यक्रमास आ. मकरंद पाटील, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष मोहन भोसले, किसन वीर कारखान्याचे माजी संचालक संदीप पोळ, वाई तालुका महिला कॉंग्रेस अध्यक्षा अल्पना यादव व वाई तालुक्‍यातील सर्व गावातील भाविक व वारकरी उपस्थित होते.

 


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)