सतीशराव मराठे यांचा गौरव करताना सीए. सी. व्ही. काळे, उपाध्यक्ष राजेंद्र चावलानी, संचालक मदनलाल ओसवाल, ऍड. प्रतापराव शिंदे, प्रा. विष्णू खरे, सीए. किशोरकुमार मांढरे व मान्यवर.

वाई, दि. 6 (प्रतिनिधी) – भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे संचालक म्हणून सहकार क्षेत्रातील अनुभवी व अभ्यासू नेते सतीशराव मराठे यांची निवड झाल्याबद्दल दि वाई अर्बन को. ऑप. बॅंकेच्यावतीने पुणे येथे नुकताच त्यांचा गौरव करण्यात आला. दि वाई अर्बन को. ऑप. बॅंकेचे अध्यक्ष सीए. चंद्रकांत वामनराव तथा सी. व्ही. काळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मराठे यांना सन्मानित करण्यात आले.
सहकार भारतीचे राष्ट्रीय संरक्षक व सहकार, बॅंकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या सतीशराव मराठे यांची केंद्र शासनाने नुकतीच भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या संचालक मंडळात त्यांची नुकतीच निवड केली आहे. पुणे झालेल्या कार्यक्रमात बोलताना सी. व्ही. काळे म्हणाले, मराठे यांच्या निवडीमुळे सहकारी बॅंकिंग क्षेत्राचा गौरव झाला आहे. मराठे यांचा सातारा जिल्ह्याशी जवळचा संबंध आहे. त्यांना विविध नागरी सहकारी बॅंकांमधील सर्व प्रकारच्या अडीअडचणी व बॅंकांच्या कामकाजाचा दिर्घ अनुभव आहे. आगामी काळात मराठे यांच्या माध्यमांतून नागरी सहकारी बॅंकांचे अनेक प्रश्न मार्गी लागणार आहेत. मराठे यांचा दिर्घ अनुभव व अभ्यासाच्या माध्यमांतून रिझर्व्ह बॅंकेलाही निश्‍चितच नवी दिशा मिळेल.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगावकर, बॅंकेचे उपाध्यक्ष राजेंद्र चावलानी, संचालक मदनलाल ओसवाल, ऍड. प्रतापराव शिंदे, प्रा. विष्णू खरे, सीए. किशोरकुमार मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीपाद कुलकर्णी, किसन वीर साखर उद्योगाचे संचालक प्रवीण जगताप आदी व मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)