वाई अर्बन बॅंकेचे सामाजिक कार्य आदर्शवत : सिंधुताई सपकाळ

वाई ः ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांचा गौरव करताना सीए. सी. व्ही. काळे, राजेंद्र चावलानी, अनिल सावंत, विवेक भोसले आदी.

वाई, दि. 25 (प्रतिनिधी) – वाई अर्बन बॅंक लोकसेवेच्या माध्यमांतून आर्थिक व सामाजिक क्षेत्रांत चांगले काम करीत आहे. अनाथांच्या संगोपनासाठी बॅंकेने देऊ केलेली मदत निश्‍चितच उभारी देणारी आहे, असे प्रशंसोद्‌गार महाराष्ट्रातील शेकडो अनाथांच्या माई व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांनी व्यक्त केले.
वाईचे माजी आमदार मदनराव पिसाळ यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने सिंधुताई वाई येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी दि वाई अर्बन को. ऑप. बॅंकेच्या प्रधान कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यांनी आपल्या भाषणात बॅंक चालवित असलेल्या विविध उपक्रमांबद्दल गौरवोद्‌गार काढले. याप्रसंगी बोलताना बॅंकेचे अध्यक्ष सीए. सी. व्ही. काळे यांनी बॅंकेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. वयाच्या 80 व्या वर्षीही सिंधूताई पुणे, सासवड, चिखलदरा, अमरावती आदी ठिकाणी करीत असलेल्या अनाथांच्या संगोपन कार्याचे कौतुक केले व बॅंकेच्यावतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन आदरभावे त्यांचा गौरव केला. तसेच सिंधु ताईंच्या या सामाजिक कार्यासाठी बॅंकेच्यावतीने एकवीस हजार रूपयांची मदत दिली.
याप्रसंगी बॅंकेचे उपाध्यक्ष राजेंद्र चावलानी, वाईचे उपनगराध्यक्ष अनिल सावंत, बॅंकेचे संचालक विवेक भोसले, प्रा. विष्णू खरे, डॉ. शेखर कांबळे, संचालिका सौ. अंजली शिवदे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीपाद कुलकर्णी, किसन वीर उद्योग समुहाचे संचालक प्रवीण जगताप, संतोष जमदाडे, उपसरव्यवस्थापक चंद्रशेखर काळे, संतोष बागुल, अविनंद खुंटे आदी उपस्थित होते.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)