वाई अर्बन को-ऑप बॅंक “कर्नाडस्‌’ संस्थेकडून सन्मानित

वाई – कोल्हापूरच्या कर्नाडस्‌ बॅंकिंग रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेकडून दि वाई अर्बन को-ऑप बॅंक लि. वाई बॅंकेस सर्वोत्तम आर्थिक सक्षम आणि उत्तम व्यवस्थापन असणारी बॅंक, सर्वोत्तम अध्यक्ष सीए चंद्रकांत वामनराव काळे, सर्वोत्तम सीईओ श्रीपाद व्यंकटेश कुलकर्णी व सर्वोत्तम आर्थिक अहवाल या चार पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

कोल्हापूर येथे राज्यव्यापी सहकारी परीषदेमध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार आयुक्त दिनेश ओऊळकर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड, संस्थेचे संचालक किरण कर्नाड, माधवी कर्नाड, शिवाजी विदयापीठाचे अर्थतज्ञ डॉ. विजय काकडे, वाई अर्बन बॅंकेचे ज्येष्ठ संचालक डॉ. श्री विनय जोगळेकर, संचालक मदनलाल ओसवाल, ऍड. श्री प्रतापराव शिंदे, ऍड.सीए राजगोपाल द्रविड, विद्याधर तावरे , डॉ. शेखर कांबळे, स्वरूप मुळे तसेच राज्यातील विविध बॅंकांचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. विद्याधर अनास्कर व दिनेष ओऊळकर यांनी बॅंकेच्या कामकाजाची प्रशंसा केली व वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)