“वाई अर्बन’च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन उत्साहात

वाई – येथील दि वाई अर्बन को.ऑप. बॅंकेच्या 2019 या वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन बॅंकेचे अध्यक्ष सीए. चंद्रकांत वामनराव तथा सी. व्ही. काळे व मान्यवरांच्या हस्ते वाईतील महागणपती मंदिरात उत्साहात पार पडले. वेदमूर्ती शंकरराव अभ्यंकर यांच्या वेदमंत्र पठणाने दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यास प्रारंभ झाला.

बॅंकेचे अध्यक्ष सीए. सी. व्ही. काळे म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून आपली बॅंक दिनदर्शिका प्रकाशित करीत असते. याही वर्षी बॅंकेने आकर्षक अशी दिनदर्शिका प्रकाशित केलेली आहे. या दिनदर्शिकेच्या माध्यमातून बॅंकेच्या ठेवी व कर्ज योजनांची माहिती खातेदार-ग्राहकांपर्यंत पोहचत असते. त्या माध्यमांतून सामान्य जनतेला बॅंकिंगच्या सुविधा मिळत असतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी बॅंकेचे उपाध्यक्ष राजेंद्र चावलानी, अर्बन परिवाराचे पोपटलाल ओसवाल, अरूण देव, बॅंकेचे संचालक डॉ. विनय जोगळेकर, मदनलाल ओसवाल, ऍड. प्रतापराव शिंदे, विवेक भोसले, ऍड. सीए. राजगोपाल द्रविड, विद्याधर तावरे, मनोज खटावकर, प्रा. विष्णू खरे, भालचंद्र देशपांडे, डॉ. शेखर कांबळे, स्वरूप मुळे, संचालिका सौ. अजली शिवदे, सौ. गीता कोठावळे, तज्ज्ञ संचालक सीए. किशोरकुमार मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीपाद कुलकर्णी, महाराष्ट्र स्टेट केमिस्ट ऍण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे संचालक व वाई तालुका अध्यक्ष अरूण पवार, उद्योजक यशवंत जमदाडे, नगरसेवक राजेश गुरव, अविनाश जोशी, सोपान दाभोळे, उपसरव्यवस्थापक चंद्रशेखर काळे, संतोष बागुल, चेतन काळे, सुमित काळे आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)