वाईत 2 डिसेंबरपासून राज्यस्तरीय जलदगती बुध्दिबळ स्पर्धा

सातारा – रविवार दि.2 डिसेंबर रोजी, वाई शहर येथे कृष्णाई चषक अजिंक्‍यपद खुल्या एलो 1300 रेटींग राज्यस्तरीय जलदगती बुध्दिबळ स्पर्धा 2018 या खुल्या जलदगती बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन चेस क्‍लब (वाई) कडून सातारा जिल्हा बुध्दिबळ संघटनेच्या मान्यतेने कृष्णाबाई संस्थान सभागृह, भीमकुंड आळी, रविवार पेठ, वाई शहर’ येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे सलग 6 वे आयोजन आहे

प्रत्येक वर्षी नियमितपणे आंतरराष्ट्रीय नियमानुसार या स्पर्धेचे आयोजन होत असते. ही स्पर्धा खुल्या गटात स्विस लीग (साखळी पध्दतीने) खेळवली जाणार असून खुल्या वयोगटाला वयाची अट नाही. बिगर मानांकित ते 1299 मानांकन असलेला कोणत्याही वयाचा ज्याला बुध्दिबळ खेळता येते असा कोणताही खेळाडू यात सहभाग घेऊ शकतो.
वयोगटासाठी खास बक्षिसे –

-Ads-

वयोगट 7,9,11,13,15 या गटात प्रथम, द्वितीय, तृतीय यांना आकर्षक चषक व मेडल अशी रु.18,500 ची एकुण 39 रोख रक्कम व चषक, मेडल्स सह अशी बक्षीसे ठेवण्यात आलेली आहेत. या सदर स्पर्धेत सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, मुंबई, नाशिक, मिरज, बेळगाव, सुरत इ. शहरातील नामांकित आणि आंतरराष्ट्रीय मानांकित बुद्धिबळ खेळाडू सहभागी असून, आतापर्यंत 100 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला असून सातारा जिल्ह्यातील खेळाडूंनी लवकरात लवकर सहभाग नोंदवून आपल्या चांगल्या खेळाचे प्रात्यक्षिक सर्वांना दाखवावे ही अपेक्षा आहे.

1 डिसेंबर अखेरपर्यंत स्पर्धा प्रवेश स्वीकारण्यात येतील. स्पर्धा प्रवेशासाठी श्रीकांत अडसूळ यांच्यांशी संपर्क करावा. स्पर्धेची सुरुवात रविवार दि.2 डिसेंबर रोजी, सातारा जिल्हा बुद्धिबळ असो. चे अध्यक्ष जयसिंग उथळे यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता उद्‌घाटन होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)