वाईत मोफत विकास फूट, पोलिओ कॅलिपर्स शिबिर

वाई – येथील स्व. दिनेश ओसवाल स्मृती प्रतिष्ठान आणि लार्सन ऍन्ड टुब्रो भारत विकास परिषद, शाखा सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 9 डिसेंबर रोजी मोफत विकास फूट (कृत्रिम पाय) व पोलिओ कॅलिपर्स शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

शेतकरी बहुउद्देशीय हॉल, बाजार समिती वाई येथे सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत होणाऱ्या या शिबिरात अपंग व्यक्तींना मोफत विकास फूट देण्यात येणार आहेत. शिबिराच्या दिवशी अपंग व्यक्तींच्या पायाचे मोजमाप घेण्यात येऊन नंतर कृत्रिम पाय देण्यात येणार आहे. तसेच पोलिओग्रस्तांना मोफत कॅलिपर्स देण्यात येणार असल्याची माहिती स्व. दिनेश ओसवाल स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष पोपटलाल ओसवाल यांनी दिली.

-Ads-

यापूर्वी प्रतिष्ठानच्यावतीने संपूर्ण जिल्ह्यात मोफत नेत्रचिकित्सा शिबिरांचे आयोजन करून अनेकांना दृष्टी देण्याचे काम केले आहे. तसेच दुर्गम कांदाटी खोरे व वाईच्या पश्‍चिम भागातील विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप केलेले आहे. शालेय विद्यार्थिनींसाठी मोफत रुबेला लसीकरण मोहिमही प्रतिष्ठानने राबविली होती. देशपातळीवर कार्यरत असणाऱ्या भारत विकास परिषदेनेही देशभरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले असून पुण्यामध्ये कायमस्वरुपी विकलांग पुनवर्सन केंद्र सुरू केले आहे.

अपंगांची शारीरिक दुर्बलता लक्षात घेऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा संकल्प स्व. दिनेश ओसवाल स्मृती प्रतिष्ठान आणि भारत विकास परिषद यांनी केला आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करणे आवश्‍यक असून त्यासाठी अध्यक्ष पोपटलाल ओसवाल, नगरसेवक दीपक ओसवाल, भारत विकास परिषद सातारा शाखा अध्यक्ष अनिल काटदरे, सचिव सतीश मुळे यांचेशी संपर्क साधावा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)