वाईत “दारू नको, दुध प्या’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

तरुणांचे पाऊल परिवर्तनाकडे पडल्याने नागरिकांमध्ये समाधान

वाई – थर्टी फर्स्टच्या मध्यरात्री अवघा देश जल्लोष करत होता. कुठे फटाक्‍यांची आतिषबाजी होत होती, कुठे धिंगाणा नृत्य, तर कुठे दारूचा महापूर. थर्टी फर्स्टचा होत असलेला हा अपप्रसार रोखण्यासाठी दारूच्या जल्लोषात बुडालेल्या तरुणांना एक नवा संदेश वाईमधील तरुणांनी दिला. “दारू नको, दुध प्या’ एक पाऊल परिवर्तनाकडे’ या उपक्रमाद्वारे गावोगावी जाऊन दुध वाटप करण्यात आले.

वाई तालुक्‍यात वाई यंगस्टर्स यांच्या संकल्पनेतून कृष्णाई सोशल फोरम व वाई पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने तरुणांनी थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन दारू न पिता करावा, यासाठी “दारू नको, दुध प्या’ या उपक्रमांतर्गत मोफत मसाला दुध 31 डिसेंबर 2018 रोजी रात्री 8 ते 11 या वेळेत वाईतील किसनवीर चौक तसेच आसपासच्या गावात जाऊन कार्यक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला संपूर्ण वाईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

वाई यंगस्टर्स, वाई जिमखाना, आस्था संस्था, रोटरी क्‍लब वाई, उत्कर्ष पतसंस्था, सिद्धिविनायक गणेश मंडळ, रविवार पेठ, रोटरॅक्‍ट क्‍लब, वाई, केया युथ संस्था, सुयश प्रतिष्ठान, यशोधन संस्था, कृष्णा नदी सेवा कार्य समिती, रुद्रशंभो प्रतिष्ठान, अंधश्रद्धा निर्मुलन समिती, पतंजली योग समिती, आर्ट ऑफ लिव्हींग, टीम वाई मॅरेथान, योद्धा प्रतिष्ठान, मानाचा गणपती ब्राह्मणशाही, ब्राह्मणशाही महिला मिशी ग्रूप, वाई पांचाळ सोनार समाज आदी संस्थांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)