वाईत चित्रकला, रांगोळी रंगभरण स्पर्धेला शाळांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद

वाई – लहान मुलांमधील उपजत कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी श्री. ररुप, केया युथ संस्था, अहंमदभाई पिंजारी प्रतिष्ठान व दिपराज फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वाई येथे भव्य चित्रकला व रांगोळी रंगभरण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेस सर्व शाळांमधून शेकडो स्पर्धकांनी सहभाग नोंदवत 567 स्पर्धकांनी सहभाग घेतला.
मुंबईवर 2008 साली झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यांत शहिद झालेल्यांना आदरांजली वाहण्यात आली. तसेच डॉ. शेडगे मार्गदर्शनाखाली गोवर आणि रूबेला लसीकरणाची जनजागृती करून माहिती देण्यात आली.

या स्पर्धेत स्पर्धकांनी रांगोळी व चित्रकलेतून स्वच्छ वाई सुंदर वाई, वृक्षारोपण, पाणी वाचवा, रूबेला लस जनजागृती अशी जनजागृती केली. चित्रकला स्पर्धेमध्ये यशस्वी झालेले स्पर्धक पुढील प्रमाणे इयत्ता पहिली – प्रथम श्रवण कांबळे, द्वितीय रसिका ताटे, इयत्ता दुसरी – प्रथम अन्विषा जमदाडे, द्वितीय कृष्णा शिपटे, इयत्ता तिसरी – प्रथम आर्या पोरे, द्वितीय मनस्वी लोखंडे, इयत्ता चौथी – प्रथम लझीना पटाईत, द्वितीय आर्यन शिंदे, इयत्ता पाचवी – प्रथम उज्वल भगत, द्वितीय नुसरत मुलानी, इयत्ता सहावी – प्रथम रविराज शिदगुंडी, द्वितीय प्रतिक्षा ससाणे, इयत्ता सातवी – प्रथम मुफिजा मुल्ला, द्वितीय गोविंद गांधी, इयत्ता आठवी – प्रथम पार्थ पलंगे, द्वितीय मयुर पोळ, इयत्ता नववी – प्रथम ईशा रंगारी, द्वितीय शमिका बोरकर, इयत्ता दहावी – प्रथम आदित्य जाधव, द्वितीय सानिका धनवे. रांगोळी स्पर्धेत यशस्वी विद्यार्थी इयत्ता पाचवी – प्रथम वैभवी जाधव, द्वितीय धनश्री शेंडे, इयत्ता सहावी – प्रथम श्रेया गाढवे, द्वितीय पूजा ननावरे, इयत्ता सातवी – प्रथम वैष्णवी आनंद, इयत्ता आठवी – प्रथम भूमी गुजर, द्वितीय रोशनी जायगुडे, इयत्ता नववी – प्रथम सायली राऊत, द्वितीय राणी पुराणे, इयत्ता दहावी – प्रथम अंतरा जावलीकर. स्पर्धेचे पंच म्हणून महेंद्रकुमार पिसाळ, सुमित रोकडे, विजय केंडे, सोमनाथ वायदंडे व वासीम पिंजारी या कलाशिक्षकांनी काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अभिजीत दळवी, सचिन कामटे, मितेश गोसावी, दिपराज पिसे, रमेश काळे, समीर ढेकाणे, तुषार खोपडे, दिपक सपकाळ यांनी परिश्रम घेतले. यशस्वीतांना संजय शेटे, अरविंद पोरे, संजय लोहारे, अजिंक्‍य दिवेकर यांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली.

==========================


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)