वाईत कचेरीसमोर बेशिस्त पार्किंग

वाई – वाई येथील तहसील कार्यालयासमोर रस्त्यावर नेहमीच बेशिस्त पार्किंगचे दर्शन घडते. रस्त्याच्या दुतर्फा वाहनधारक कशी वाहने लावत असतात. विशेष म्हणजे अधिकारी वर्गदेखील आपली वाहने बेशिस्त पद्धतीने पार्क करत असतात.

रस्त्यावरच वेडीवाकडी वाहने लावली जात असल्याने याठिकाणी अनेकदा वाहतुकीचे कोंडी होते. मात्र, ही कोंडी फोडण्यासाठी पोलीस कर्मचारीदेखील नसतात. त्यामुळे नागरिकांना या कोंडीचा नेहमीच त्रास सहन करावा लागतो. दरम्यान, याठिकाणी नियमित वाहतूक पोलीस असणे गरजेचे असतानाही पोलिसाची नेमणूक केली जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)