वाईत अतिक्रमणांवर पालिकेचा बुलडोजर

व्यापाऱ्यांचा “वाई बंद’चा इशारा तर मुख्याधिकारी अतिक्रमण हटाव मोहिम करणार तीव्र

वाई – वाईत पालिका प्रशासनाच्यावतीने मंगळवारी अतिक्रमण हटाव मोहिम सुरू करण्यात आली. मुख्याधिकारी विद्या पोळ यांनी पोलिस बंदोबस्तात म. फुले भाजी मंडईतील अतिक्रमणे जेसीपीच्या सहाय्याने पाडली. अतिक्रमण हटाव मोहिमेला व्यापारी व भाजी विक्रेत्यांनी विरोध दर्शविल्याने तणाव निर्माण झाला होता. मात्र कोणालाही न जुमानता पोळ यानी कारवाई सुरूच ठेवली. दुपारपर्यंत वीसहुन अधिक अतिक्रमणे पाडण्यात आली.

-Ads-

बुधवारी किसनवीर चौक, स्टेट बॅंक, बसस्थान, सेंट थॉमस, पीडब्लुडी, कचेरी व पोस्ट ऑफिस परिसरातील अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. दरम्यान पालिकेच्या या अतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात व्यापाऱ्यांनी बुधवारी वाई बंदचा इशारा दिला आहे. तसेच शिवसेनेने अतिक्रमण मोहिमेला पाठिंबा दिल्याने या मोहिमेला आता राजकीय रंग येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)