वाईतील अतिक्रमण म्हणजे “दुष्काळ तेरावा महिना’

धनंजय घोडके
वाई – अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी ही वाई शहरवासियांच्या पाचवीलाच पुजलेली आहे. विशेष म्हणजे महाबळेश्‍वर, पाचगणी, धोम धरण या पर्यटनस्थळांना तसेच लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेव याठिकाणी जाण्यासाठी वाईतूनच जावे लागते. याशिवाय वाई शहरात असलेले महागणपतीचे देवस्थान हे राज्यभरात प्रसिद्ध असल्याने याठिकाणीही मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. इतक्‍या मोठ्या प्रमाणात येणारे पर्यटक, भाविकांमुळे शहरातील रस्त्यांवर नेहमीच वाहतुकीचा ताण असतो.

दरम्यान, वाई शहराची रचना ही पुरातण असून अनेक रस्ते अरुंद आहत. त्यातच अतिक्रमणामुळे “दुष्काळात तेरावा महिना’ अशी अवस्था वाई शहरात झाली आहे. अतिक्रमण हे वाहतुकीची कोंडी होण्याचे मुख्य कारण आहे. अरूंद रस्ते बेशिस्त पार्किंग तसेच व्यवसायिकांच्या अतिक्रमणामुळे वाहतूकीची कोंडी होत असते. अतिक्रमण व अरूंद रस्त्यांमुळे वाई शहराच्या इतर भागातही वहातुकीची कोंडी नित्याची झाली आहे. यामध्ये गंगापूरी, शाहीर चौक ते किसनवीर चौक या रस्त्यावर प्रत्येक चौकात कोंडी होत असते.

ग्रामीण रूग्णालय परिसर, पोस्ट ऑफीस परिसर या भागात नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते. यामुळे तालुक्‍यातील लोकांचा, भाविकांचा व पर्यटकांचा वेळ व पैसा वाया जावून मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे प्रशासनाने वाढत्या वाहतूकीच्या समस्यावर कायमस्वरूपी तोंडगा काढण्याच्या दृष्टीने पालिकेने अतिक्रमण काढवे अशी मागणी वाईकर नागरिकांमधून करण्यात येत आहे.

वाई शहरात अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर झाले असून यामुळे वाहतूकीची कोंडी होत असते. यामुळे पादचाऱ्यांना व शाळा, कॉलेजला जाणाऱ्या विदयार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. तसेच सोमवारच्या बाजारादिवशी चोरीच्या घटना घडत असतात. प्रशासनाने अतिक्रमण काढून व्यवसायिकांना कडक नियमावली लागू करून उल्लंघन करणाऱ्यास कडक कारवाई करावी.
– दिलीप डोंबिवलीकर

अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागतात. यामुळे प्रवासी व स्थानिक नागरिकांचा वेळ वाया जाऊन मनस्ताप सहन करावा लागतो. भाजी मंडईमध्ये अतिक्रमणामुळे वहातुकीची कोंडी होत असते. तसेच चोरीच्या विविध घटना घडतात. शहरातील अतिक्रमण काढून कडक नियमावली लागू केल्यास वहातूक सूरळीत होण्यास मदत होऊन चोरीसारख्या घटनांना आळा बसेल व पोलिस प्रशासनावर पडणारा ताण कमी होईल.
महेंद्र निंबाळकर, सहा.पोलिस निरीक्षक, वहातूक शाखाप्रमुख


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)