वाईच्या मुख्याधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा

सत्ताधारी, विरोधकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सातारा – वाई पालिकेच्या नगराध्यक्षा विद्या पोळ या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक यांना विश्‍वासात न घेता कामकाज करीत आहेत. तक्रारी घेऊन येणाऱ्या नागरिकांनाही विद्या पोळ भेटत नाहीत. आज मंगळवार दि. 27 रोजी सर्वसाधारण सभा होती. मुख्याधिकाऱ्यांसह खाते प्रमुख उपस्थिती नव्हते. अशा मनमानी मुख्याधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यानी सूचना केल्या. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. परंतु पोळ यांच्या कामात सुधारणा झाली नाही.

-Ads-

विकास कामांचे प्रस्ताव प्रलंबीत आहेत. 2 कोटीचा निधी परत जाण्याच्या मार्गावर आहे. हिटलरशाहीने काम करणाऱ्या पोळ यांना कामात सुधारणा करण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत मुदत देत आहे.कामात सुधारणा झाली नाही तर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे. अन्यथा सत्ताधारी व विरोधक सर्व नगरसेवक तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा नगराध्यक्षा प्रतिभा शिंदे, उपनगराध्यक्ष अनिल सावंत, विरोधी पक्षनेते सतीश विराट यांच्यासह सर्व नगरसेवकांनी यांनी सातारा येथे संयुक्त पत्रकार परिषदेत दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)