वाईच्या मुख्याधिकारी करणार राज्याचे प्रतिनिधीत्व

वाई – राष्ट्रीय स्तरावरील सांडपाणी व मैलापाणी व्यवस्थापन या विषयात संपूर्ण देशभरासाठी प्रक्रिया आणि प्रकल्प यावर धोरणात्मक निर्णय घेवून आराखडे तयार करण्यासाठी केंद्रीय मंत्रालय गृहनिर्माण आणि नागरी सेवा यांच्यावतीने गठीत करण्यात आलेल्या तज्ञ समितीवर महाराष्ट्र राज्याच्या प्रतिनिधी म्हणून वाई नगरपालिकेच्या मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्रालयातर्फे ही समिती गठीत करण्यात आली असून समितीच्या अध्यक्षपदी गृहनिर्माण व नागरी सेवा मंत्रालयाचे मुख्य सल्लागार वी. के. चौरसिया यांची तर उपसल्लागार रोहित कक्कर हे या समितीचे सचिव आहेत. या समितीमध्ये गृह मंत्रालयाचे इतर दोन सदस्य, प्रदूषण मंडळाचे शास्त्रज्ञ, आयआयटी मद्रास व रुरकी यांचे विभाग प्रमुख तसेच ओरिसा, तामिळनाडू, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश या राज्यातील जल प्रदुषण व उपाययोजना या संदर्भात काम करणारे तज्ञ सदस्य आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ही समिती केंद्रशासनाच्या नियंत्रणाखाली काम करणार असून देशभरातील मैलापाणी व्यवस्थापन अंतर्गत संकलन आणि वाहतूक यांचे शास्त्रोक्त पध्दतीने शोध व पुर्नचक्रीकरण, पुनर्वापर यासाठी नविन तंत्रज्ञानाचा वापर करणे, आर्थिक उपयुक्तता तपासणे आणि विविध राज्यांतील विविध भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून त्या ठिकाणच्या स्थानिक परिस्थितीनुसार योग्य त्या उपाययोजना सुचविणे आदी कामे ही समिती करणार आहे.

वाई शहरातील मैलापाणी प्रकल्प हा राज्यातील पथपदर्शी प्रकल्प असून तो पालिकेने यशस्वीरित्या राबविलेला आहे. वाई पालिकेने केलेल्या कामाची माहिती मुख्याधिकारी केंद्रीय समितीला देणार असून अशा प्रकारचा प्रकल्प राबविताना येणाऱ्या अडचणींबाबत प्रत्यक्ष चर्चा व उपाययोजना करणे अधिक सोयीचे होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)