वाईच्या पुरवठा शाखेला आग : महत्वाची कागदपत्रे जळून खाक

आग लागल्याने प्रशासनाची धावपळ

भुईंज – वाईच्या तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेला शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. यामध्ये महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. तर २५ हजार नवीन शिधापत्रिका मात्र यातून वाचल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शनिवारी सकाळी पुरवठा शाखेच्या एका खोलीत शॉर्टसर्किटमुळे आग लागली. सुरुवातीला ही आग छोट्या स्वरूपात होती. मात्र कागदपत्रांना लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले होते. सात वाजेपर्यंत या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना समजल्यानंतर नागरिकांनी तात्काळ तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना याची कल्पना दिली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी वाई आणि पाचगणी येथील अग्निशामक दलाला पाचारण केले. यानंतर काही वेळातच ही आग आटोक्यात आणण्यात आले. मात्र यामध्ये बरीच महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. सुदैवाने नवीन काढण्यात आलेल्या २५ हजार शिधापत्रिका दुसऱ्या खोलीत असल्यामुळे जळल्या नाहीत. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे, प्रांताधिकारी संगीता राजापुरकर-चौगुले, तहसीलदार रमेश शेडगे व सर्व अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)