वाईच्या पश्‍चिम भागातील रस्त्यांची चाळण

वाई ः रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना वाहन चालवणे जिकिरीचे झालेले आहे.

वाई-जोर रस्त्यावर खड्डेच खड्डे
वाई, दि. 4 (प्रतिनिधी) – वाई तालुक्‍यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय अशी झाली आहे. दरम्यान, तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील रस्त्यांवर फार मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षश: चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहनधारकांना वाहने चालविणेही मश्‍किल झाले आहे.
खड्ड्यांची खोली चार ते पाच फुटांची आहे, दररोज या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये अनेकांचे जीव जावून कित्येक जण कायमचे अपंग झाले आहेत तर अनेकांना कायमचा पाठीचा आजार सुरु झाला आहे. डॉक्‍टर तज्ञांच्या मते रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांमुळे मणक्‍यामध्ये गॅप तयार होवून अनेकांची कायमची गाडी चालविणे बंद झाले आहे. वाहनांचे होणारे नुकसान वेगळेच.
पाचगणी महाबळेश्वरला येणारे पर्यटक हा धोम- बलकवडी धरणांना भेट दिल्या शिवाय परतीच्या मार्गाने जात नाहीत. सुट्टीच्या दिवशी बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त असते, त्यामुळे रस्त्याची अवस्था बिकट होवूनही दुरुस्ती केली जात नाही, हे कसले पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करणार! या ठिकाणी येणारा पर्यटक पूर्णपणे हैराण झाले आहेत. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसह स्थानिक वाहन चालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
वाई तालुक्‍यातील अनेक संघटनांनी पडलेल्या खड्ड्यांच्या प्रश्नांसंदर्भात आवाज उठविण्यासाठी वाईच्या बांधकाम विभागाला निवेदन देण्याची तयारी केली आहे. या संघटना आंदोलनाच्या तयारीत आहेत. संबंधित विभागाकडून त्या खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्यात येत आहे, मात्र तोही तग धर नाही, काही दिवसांतच पुन्हा परिस्थिती जैसे थे अशीच होत आहे. रस्त्यावरून साधे चालणेही सोपे राहिले नाही. तालुक्‍यातील सर्वच रस्त्यांची अवस्था बिकट आहे, यामध्ये वाई-सुरूर, वाई-पाचगणी, वाई-सातारा वाई-जोर, वाई- जांभळी या वाई शहराशी निगडीत असणाऱ्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक असते.
पावसाचे कारण पुढे करत संबंधित विभागाने खड्डे मुजविण्याच्या कामात चालढकल केली आहे, परंतु यापुढे असे चालणार नाही. तरी तालुक्‍यातील मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती त्वरित करावी व लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार थांबवावा, अशी मागणी जोर धरत आहे. वाईच्या पश्‍चिम भागात साठ ते सत्तर किलोमीटर अंतरात शंभर गावातील नागरिकांना या खड्डे असलेल्या रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या साईड पट्ट्याही खचल्या आहेत. दरम्यान, संबंधित ठेकेदारावर त्वरित कारवाई करून रस्त्यातील खड्डे मुजविण्यास भाग पाडावे अशीही मागणी जोर धरत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)