वाईच्या कृष्णा नदीला अस्वच्छतेचा विळखा

वाई : कृष्णा नदीपात्राला लागून असलेल्या घाटावर कपडे, गोधड्या धुण्यासाठी झालेली गर्दी. (छाया : धनंजय घोडके)

नदी स्वच्छता सेवा कार्य समितीमध्ये संतापाची लाट
वाईतील सामाजिक संस्थांनी केलेले प्रयत्नांवर पाणी
पालिका प्रशासनाने ठोस कृती करण्याची वाईकरांची मागणी
वाई, दि. 13 (प्रतिनिधी) – लोकांची परंपरा कृष्णा नदी स्वच्छतेच्या मुळावर आल्याने स्वच्छ वाहते कृष्णामाई पुन्हा अस्वच्छतेच्या विळख्यात अडकली आहे. कृष्णा नदीच्या घाटावर धोमपासून कराडपर्यंत सण उत्सवाच्यानिमित्ताने लोकांची कित्येक पिढ्यांची परंपरा आहे की, घरातील दररोज वापरातील कपडे, भांडी व देव्हाऱ्यातील देवसुध्दा कृष्णा नदीवर आणून स्वच्छ धुवून मगच कोणत्याही उत्सवाला सुरुवात करायची. मात्र ही प्रथा कृष्णा नदीच्या मुळावर येवून बसली आहे. सर्वच प्रकारचे कपडे नदीच्या पाण्यात धुतल्याने कृष्णा नदीला धोबी घाटाचे स्वरूप प्राप्त झाले झाल्याने कृष्णेला अस्वच्छतेचा विळखा पडला आहे.
कृष्णामाई स्वच्छतेसाठी वाईतील ज्या संस्थांनी, संघटनांनी, नगरपालिकेने आहोरात्र कष्ट उपसले ते वाया गेल्याची भावना वाईकरांमधून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांमधून संतापाची लाट उसळली आहे. याकडे पालिका प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे बोलले जात आहे. ही अतिशय गंभीर बाब असून याबाबत ठोस उपाय योजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. गणपती उत्सवाप्रमाणे सर्व सण उत्सवाच्या पूर्वसंध्येला पालिकेने गार्ड उभे करून नदीच्या घाटावर कपडे धुण्यास मज्जाव करणे आवश्‍यक आहे. कृष्णा नदीला धोबी घाटाचे स्वरूप तर आले आहेच परंतु नदीतून वाहणारे स्वच्छ पाणी अस्वच्छ होवून त्याला ओंघळ स्वरूप आले आहे. त्यामुळे सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे.
गेल्या कित्येक वर्षाची परंपरा लोकांनी बाजूला ठेवून गणपतीच्या मूर्ती पाण्यात विसर्जन करण्यापेक्षा मूर्ती दान प्रक्रियेला चांगला प्रतिसाद देत कृष्णा स्वच्छतेला हातभार लावला. त्यामुळे नदी स्वच्छतेचा प्रश्न मिटण्यास मदत झाली आहे. परंतु, वाई नगरपालिकेच्या प्रशासनाकडून यावर्षी कोणत्याही पद्धतीचे नियोजन होताना दिसत नाही. जशी ही अतिशय जुनी परंपरा लोकांनी कृष्णा नदी स्वच्छतेसाठी बाजूला ठेवून नदी प्रदूषण मुक्त केली. तशाच पध्दतीने कृष्णा नदीच्या स्वच्छतेसाठी घरातील कामे नदीवर करणे पूर्णपणे बंद करण्याची नितांत गरज आहे. कृष्णा नदी सेवा कार्य समिती गेल्या वर्षभरात दर रविवारी नदीवरील प्रत्येक घाटावर स्वच्छतेसाठी राबत असून कोणीही त्यांच्या मदतीला जाताना दिसत नाहीत. मात्र स्वच्छ नदी घरातील घाणेरडे कपडे धुवून अस्वच्छ करण्यासाठी पुढे येताना दुर्दैवाने दिसत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)