वांजळे शाळा दुरुस्तीसाठी निधी

पिरंगुट – वांजळे (ता. मुळशी) येथील शाळेच्या दुरुस्तीसाठी पंचायत समितीच्या शेष फंडातून 2 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती माजी सभापती महादेव कोंढरे यांनी दिली.
गेल्या आठवड्यात मुठा खोऱ्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वांजळे येथील प्राथमिक शाळेच्या इमारतीचे सिमेंट पत्रे उडून फुटले. नुकताच पिरंगुट पंचायत समिती गणातील विविध विकास कामांसाठी शेष फंडातून 16 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. त्यातून हा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे माजी सभापती कोंढरे यांनी सांगितले.
निधी मंजूर झालेली गावे, काम आणि रक्‍कम (कंसात) पुढीलप्रमाणे – आंदगाव – आटाळवाडी मधील अंतर्गत रस्ता (तीन लाख रुपये), बोतरवाडी येथील अंतर्गत रस्ते (तीन लाख रुपये), माळेगाव चोरघेवाडीतील पाण्याची साठवण टाकी (तीन लाख रुपये), आंदगाव येथे पिण्याच्या पाण्याची अंतर्गत पाइप लाइन (एक लाख रुपये), दासवे येथील बौत्रवस्तीतील अंतर्गत रस्ता (चार लाख अठ्ठावीस हजार रुपये).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)