वांगी, काकडी, लसूण, टोमॅटो महागले

थंडीमुळे फळभाज्यांचे उत्पादन कमी  ः आवकेत वाढ झाल्याने कांदा घसरला

पुणे – थंडीमुळे फळभाज्यांचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे मार्केट यार्डातील भाजीपाला विभागात फळभाज्यांची कमी होणारी आवक कायम आहे. त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने वांगी, काकडी, लसूण, टोमॅटोच्या भावात दहा टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. सध्या जिल्ह्यासह परराज्यातूनही आवक होत आहे. मात्र, ही आवक अपुरी पडत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या आवकेत मोठी वाढ झाल्याने कांद्याच्या भावात घसरण झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.

रविवारी बाजारात सुमारे 150 ट्रक इतकी शेतमालाची आवक झाली. कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि गुजरात येथून 15 ते 16 टेम्पो हिरवी मिरची, बेंगलोर येथून 2 टेम्पो आले, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून 3 ते 4 टेम्पो शेवगा, राजस्थान येथून 12 ट्रक गाजर, मध्य प्रदेश येथून 32 ट्रक मटार, गुजरात आणि कर्नाटक येथून कोबी 4 ते 5 ट्रक, मध्य प्रदेश आणि गुजरात येथून लसणाची साडेचार ते पाच हजार गोणी इतकी आवक झाली. स्थानिक भागातून सातारी आले 1200 पोती, टॉमेटो तीन ते साडेतीन हजार पेटी, फ्लॉवर 14 ते 15 टेम्पो, कोबी 7 ते 8 टेम्पो, भेंडी 5 ते 6 टेम्पो, ढोबळी मिरची 10 ते 12 टेम्पो, हिरवी मिरची 2 ते 3 टेम्पो, पावटा 3 ते 4 टेम्पो, गवार 2 ते 3, कांद्याची 175 ट्रक, आग्रा, इंदौर आणि तळेगाव येथून मिळून बटाट्याची 45 ट्रक इतकी आवक झाली.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : जुना 30-50, नवा 70-100, बटाटा : तळेगाव 70-100, इंदौर 50-90, लसूण : 150-250, आले : सातारी 500-600, बेंगलोर 600-650, भेंडी : 400-450, गवार : 550-650, टोमॅटो : 160-200, दोडका : 300-350, हिरवी मिरची : 300-350, दुधी भोपळा : 140-160, चवळी : 250-280, काकडी : 160-180, कारली : 250-300, पापडी : 180-200, पडवळ : 250, फ्लॉवर : 80-120, कोबी : 60-80, वांगी : 250-300, डिंगरी : 250, ढोबळी मिरची : 250-320, तोंडली : कळी 300, जाड : 150, शेवगा : 400-450, गाजर : 70-100, वालवर : 220-250, बीट : 120-140, घेवडा : 300-350, कोहळा : 100-140, आर्वी : 350, घोसावळे : 200-220, ढेमसे : 300, पावटा : 250-300, भुईमूग शेंग : 500, मटार : स्थानिक 280-300, परराज्य 200-240, तांबडा भोपळा : 100-120, सुरण : 160-180, मका कणीस : 80-120, नारळ (शेकडा) : 1000-1600.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)