“वह कौन थी’मध्ये ऐश्‍वर्याच्या जागेवर बिपाशा बासू

1964 साली आलेल्या मनोज कुमार आणि साधना यांच्या “वह कौन थी’चा रिमेक करण्याचे काम सुरू आहे, असे समजते आहे. आणि या रिमेकमध्ये बॉलिवूडमधील बोल्ड ऍन्ड ब्युटिफुल ऍक्‍ट्रेस आणि बंगाली बाला बिपाशा बासू लवकरच दिसण्याची शक्‍यता आहे. या लीड रोलमध्ये ऐश्‍वर्या रॉय दिसणार अशी चर्चा सुरू होती. मात्र काही कारणाने हे समिकरण जुळले नाही. आता या रोलसाठी बिपाशा बासूचे नाव निश्‍चित झाले असल्याचे समजते आहे. या रिमेकचे शुटिंग 10 ऑक्‍टोबरपासून सुरू होणार आहे.

जरी हा जुन्या “वह कौन थी’चा रिमेक असला तरी मूळ कथानकामध्ये यावेळी बरेच बदल केले जाणार आहेत. यावेळी बिपाशा बासू बरोबर अर्जुन एन. कपूर आपल्या ऍक्‍टिंगच्या कारकिर्दीला सुरूवात करणार आहे. अर्जुन कपूरने आतापर्यंत प्रॉडक्‍शनमध्ये बरेच काम केले आहे. त्याने प्रेरणा अरोराच्या बरोबर मिळून बऱ्याच सिनेमांचे प्रॉडक्‍शन केले आहे. जुन्या “वह कौन थी’मध्ये मनोज कुमार आणि डबल रोलमध्ये साधना होती. एन.एन. सिप्पींच्या प्रॉडक्‍शनच्या या सिनेमाचे डायरेक्‍शन राज खोसला यांनी केले होते. त्यातील सस्पेन्स, थ्रील आणि संगीत अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)