वस्तू आणि सेवा कर परिषदेची 14 वी बैठक पडली पार

नवी दिल्ली  – केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली वस्तू आणि सेवा कर परिषदेची 14 वी बैठक जम्मू आणि काश्‍मीर राज्यातल्या श्रीनगर येथे काल पार पडली. यामध्ये वस्तू आणि सेवाकरांचे दर आणि नुकसान भरपाई किती द्यावयाची याविषयी निर्णय घेण्यात आला. वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांसाठी परिषदेने 5 टक्के, 12, 18 आणि 28 टक्के कर निश्‍चिती यावेळी करण्यात आली. तसेच जीएसटी परिषदेने नुकसान भरपाई देण्याविषयी विस्तृत चर्चा करून त्याची टक्केवारी या बैठकीत निश्‍चित करण्यात आली. जीएसटी परिषदेच्या या बैठकीचा तपशील तसेच यावेळी घेतलेले निर्णय केंद्रीय अबकारी आणि सीमाशुल्क विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. http://www.cbec.gov.in या संकेतस्थळावर ही माहिती पाहता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)