वसुली मालमत्ता कराची 

मुंबईच्या अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयानंतर अनेक टॉप कार्पोरेट कंपन्या आणि संस्थांवर मालमत्ता कर वसुलीसाठी बीएमसी कडक कारवाई करू शकते. मालमत्ता कर रुपातून दहा हजार कोटी रुपये विविध संस्था, कंपनीकडे थकले आहेत. गेल्या आठवड्यात बीएमसीने अंधेरी इस्टेटमध्ये असलेले सेव्हल हिल्स रुग्णालयाच्या प्रशासकीय कार्यालयाला सिल ठोकले होते. कारण व्यवस्थापन महानगरपालिकेचे 9 कोटी रुपयांचा मालमत्ता कर भरण्यास अपयशी ठरले होते.

मालमत्ता कराची वाढती थकबाकी लक्षात घेता महानगरपालिकेने शंभर थकबाकीदारांची यादीच तयार केली आहे. त्यात कॉर्पोरेटस कंपन्या, विकासक, हाऊसिंग सोसायटीचा समावेश आहे. या यादीत पहिला क्रमांक हिंदुस्थान कम्पोजिटस लिमिटेडचा असून त्यावर 30 कोटींची थकबाकी आहे. त्यानंतर भारत डायमंडवर 25.52 कोटी रुपये, लुथारिया लालचंदानीवर 21.87 कोटी थकबाकी आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज 11.23 कोटी, जेट एअरवेज 16.58 कोटी यासारख्या बड्या कंपन्यांचा समावेश आहे. बीएमसीच्या मते दहा हजार कोटीपैकी सुमारे 5 हजार कोटींच्या मालमत्ता करावरून वाद असून त्याच्या वसुलीत बराच काळ लागू शकतो. मात्र थकबाकीची वसुली तातडीने सुरू केली जाईल, हे निश्‍चित.

अपर्णा देवकर 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)