वसुलीसाठी उसाची रक्कम कपात करण्याचा सहकारी संस्थांचा डाव : शिवाजी जवरे

अन्यथा जिल्हा उपनिबंधक कार्यालयात तीव्र आंदोलन
नगर – शेतकऱ्यांच्या गाळपास आलेल्या ऊस बिलामधून सहकारी सेवा संस्थांनी व राष्ट्रीयकृत बॅंकांनी आपली बाकी वसूल करण्यासाठी संबंधित साखर कारखान्यांकडे कर्ज वसुलीसाठी याद्या पाठवल्या आहे. शेतकऱ्यांच्या गाळपास उसाची रक्कम कपात करण्याचा सहकारी संस्था डाव आखत असून, संकटकाळी मनमानी धोरण राबवून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी जवरे यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत राज्य शासनाने शेतकरी आंदोलनामध्ये 2016 नंतर मुदतवाढ देऊन दि. 31 जुलै 2017 पर्यंत वाढविल्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांचा ऊस गाळप होऊन उसाचे पेमेंट शेतकऱ्यांच्या कर्ज खाती जमा केले आहे. ज्या शेतकऱ्यांचा ऊस गाळपास येणार आहे. अशा शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीच्या याद्या सेवा सोसायट्यांनी साखर कारखानदारांकडे पाठविल्या आहे. 2017 च्या थकबाकीदार शेतकरी कर्जमाफीस पात्र लाभार्थी ठरणार असल्याने जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे गाळपास आलेले उसाची रक्कम बॅंक अथवा सोसायट्या यांना कपात करून देऊ नये, यासंदर्भात शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळ जिल्हा उपनिबंधक, जिल्हा बॅंक व्यवस्थापन व राष्ट्रीयकृत बॅंकेच्या व्यवस्थापनाला येत्या आठ दिवसात भेटणार असून, यासंदर्भात प्रशासनाने योग्य निर्णय न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख जवरे यांनी दिली.
यावेळी राज्य सचिव रुपेंद्र काले, जिल्हा संघटक युवराज जगताप, युवा जिल्हाअध्यक्ष बच्चू मोढवे, तालुकाध्यक्ष अनिल औताडे, जनार्दन घोगरे, शरद पवार, अशोक पठारे, चांगदेव विखे, राजेंद्र गोर्डे, हरिअप्पा तुवर, नारायण टेकाळे, बबनराव उघडे आदींनी जिल्ह्यातील साखर कारखानदार व जिल्हा बॅंक व लीड बॅंक यांच्याकडे पत्रकाद्वारे मागणी केली आहे.
शेतकऱ्यांचे 2017 च्या थकीत कर्जामुळे यापूर्वी बॅंक व सोसायट्यांनी शेतकऱ्यांना नव्याने कर्ज न दिल्यामुळे शेतकऱ्यांनी उसनवारी करून, दागिदागिने गहाण ठेवून, जनावरे विकून पुढील पिकासाठी भांडवल उभे केले असून, त्या बॅंक व सोसायट्यांनी गाळपास आलेल्या ऊस बिलातून थकीत कर्जाची रक्कम कपात केली असेल, ती तत्काळ शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर वर्ग करावी आणि ज्या शेतकऱ्यांचे ऊस गाळपास येणार आहे, अशा शेतकऱ्यांचे ऊस बिलातून कर्ज वसुली करू न देता, ती रक्कम साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर वर्ग करावी. जिल्ह्यातील एका तालुक्‍यातील टीडीओ अधिकाऱ्यांशी जवरे यांनी चर्चा केली असता, डीडीओ अधिकाऱ्यांनी कर्ज वसुली व अनामत देय रक्कम याच्यावर चर्चा करताना आम्ही शेतकऱ्यांची 2017 चे थकबाकी कपात रक्कम दि. 31 मार्च 2018 रोजीच्या वार्षिक ताळेबंदात सादर न करता स्वतंत्ररीत्या आमच्या दुसऱ्या खात्यावर वर्ग करून ठेवणार आहोत. शासन निर्णयाप्रमाणे जिल्हा बॅंक धोरणाचे आदेश येताच कपात केलेल्या कर्जाची रक्कम शेतकऱ्यांना अनामत स्वरुपात तत्काळ देणार असल्याचे जवरे यांना सांगण्यात आले. कर्जदार शेतकऱ्यांची कपात रक्कम व कपात होणारी रक्कम तत्काळ शेतकऱ्यांना मिळण्यासाठी शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळ जिल्हा उपनिबंधक, जिल्हा बॅंक व्यवस्थापन व राष्ट्रीयकृत बॅंकेचे (लिड) व्यवस्थापनाला भेटणार असल्याचेही जिल्हा संपर्क प्रमुख जवरे यांनी सांगितले.
शेतकरी हिताचा तत्काळ निर्णय अपेक्षीत
2017 वार्षिक थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून, त्यांची संकटकाळात आर्थिक कोंडी होऊ नये म्हणून सोसायट्यांचे जिल्हा बॅंक व साखर कारखान्याचे व्यवस्थापनामध्ये सर्व शेतकऱ्यांचीच मुले असून, इतर वेळेस शेतकऱ्यांचा कळवळा दाखविणाऱ्यांनी खऱ्या अर्थाने अडचणींच्या काळात शेतकरी हिताचा तत्काळ निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे मत जवरे यांनी व्यक्त केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)