वसुंधरा राजे सरकारने दारू, जमीन आणि वाळू माफियांना पाठीशी घातले : गहलोत 

उदयपुर: वसुंधरा राजे सरकारने राजस्थानातील दारू, जमीन आणि वाळू माफियांना पाठीशी घातले असा आरोप ज्येष्ठ कॉंग्रेस नेते अशोक गहलोत यांनी केला आहे. गहलोत हे सध्या राजस्थानातील मेवाड प्रांतात निवणूक प्रचार सभा घेत आहेत. ते म्हणाले की यापुर्वीच्या कोणत्याही सरकारांनी राज्यातील माफियांना पाठीशी घातले नाही ते काम वसुंधरा राजे सरकारने गेल्या पाच वर्षात केले आहे.

या माफियांनी अधिकाऱ्यांशी संगनमत करून करोडो रूपयांचा घोटाळा केला. हा पैसा वरपर्यंत पोचवला गेला असा आरोपही त्यांनी केला. राजे यांच्या सरकारला 2013 मध्ये राजस्थानच्या लोकांनी मोठा कौल दिला होता. त्यांच्याकडून लोकांना फार मोठी अपेक्षा होती पण त्यांनी लोकांचा भ्रमनिरास केला. त्यांना गेल्या पाच वर्षात लोकांना भेटायला वेळच मिळाला नाही. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या समोर त्या झुकल्या असा आरोपही त्यांनी केला. कॉंग्रेसने राज्यात गोरगरीबांसाठी अनेक योजना सुरू केल्या पण राजे सरकारने त्या साऱ्या योजनांची पुरती वाट लावली असे त्यांनी नमूद केले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)