वसुंधरा राजेंच्या विरोधात कॉंग्रेसने दिला तगडा उमेदवार 

जसवंतसिंह यांच्या सुपुत्रास केले उभे 

जयपुर: राजस्थानच्या विद्यमान मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या विरोधात कॉंग्रेसने तगडा उमेदवार उभा करून भाजपला चकीत केले आहे. भाजपचे दिवंगत जेष्ठ नेते जसवंतसिंह यांचे पुत्र मानवेंद्रसिंह यांना कॉंग्रेसने झालावाड मतदार संघात वसुंधरा राजे यांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे. मानवेंद्रसिंह हे भाजपचेच आमदार होते पण त्यांनी मागच्याच महिन्यात भाजपचा राजीनामा देऊन कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. या संबंधात पत्रकारांशी बोलताना मानवेंद्रसिंह म्हणाले की मी भाजपचे आव्हान स्वीकारण्याचे ठरवले आहे. राजपुतांचे नेते जसवंतसिंह यांचा भाजपने जो अपमान केला आहे त्याचा बदला घेण्याची संधी मला या निमीत्ताने मिळाली आहे.

भाजप सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार असून या सरकारने लोकांची साफ निराशा केली आहे. कमलका फूल हमारी भूल ही घोषणा देत त्यांनी भाजप सरकारवर कडाडून टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी कॉंग्रैस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही स्तुतीसुमने उधळली. ते म्हणाले की राहुल गांधी हे देशाचे एक चांगले नेते आहेत आणि त्यांचा भविष्यकाळ उज्जवल आहे. त्यांच्यात मानवतावादी भूमिका वारंवार दिसून येते. मी त्यांना अगदी जवळून पाहिले आहे. मानवतावादी नेताच जनतेची दुखे जाणू शकतो. त्याच्यामुळे देशाला एक चांगले संवेदनशील नेतृत्व मिळाले आहे असेही मानवेंद्रसिंह यांनी यावेळी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
50 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)