‘वसुंधरा जीवनगौरव सन्मान’ प्रा. परांजपे यांना

पुणे – 13 व्या किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवांतर्गत देण्यात येणारा “वसुंधरा जीवनगौरव सन्मान’ प्रा. विजय परांजपे यांना तर “वसुंधरा मित्र संस्था सन्मान’ मल्टि. पी. एस. डब्ल्यू. एम. युनिटला देण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. यावेळी किर्लोस्कर फाउंडेशनच्या गौरी किर्लोस्कर, माधव चंद्रचुड, वीरेंद्र चित्राव, सुप्रिया गोटुरकर-महाबळेश्‍वरकर, जुई तावडे आणि डॉ. सचिन पुणेकर आदी उपस्थित होते.

या महोत्सवाचे उद्‌घाटन दि. 3 जानेवारी रोजी प्रसिद्ध दिग्दर्शक शेकर दत्तात्री यांच्या हस्ते सायंकाळी 6 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. यावेळी अतुल किर्लोस्कर यांच्या हस्ते “किर्लोस्कर वसुंधरा’ सन्मान पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. “क्‍लॅश ऑफ टायगर्स’ आणि “फ्रॉम किलर रोड टू ह्युमन हायवेज’ हे चित्रपटही दि. 3 रोजी रसिकांना पाहता येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)