वसतिगृहांमधील 1 कोटी विद्यार्थ्यांना मिळणार स्वस्तात गहू आणि तांदूळ

प्रत्येक महिन्याला बीपीएल दरात मिळणार 15 किलो अन्नधान्य
नवी दिल्ली – देशभरातील वसतिगृहांमधील सुमारे 1 कोटी विद्यार्थ्यांना केंद्र सरकार स्वस्तात गहू आणि तांदूळ उपलब्ध करणार आहे. त्याचा लाभ अनुसूूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर मागास वर्गांमधील (ओबीसी) विद्यार्थ्यांचे प्रमाण दोन-तृतीयांश असणाऱ्या वसतिगृहांमधील सदस्यांना मिळणार आहे.

या निर्णयाची माहिती केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी दिली. सर्व एससी/एसटी विद्यार्थी असणाऱ्या आंबेडकर वसतिगृहांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला दरमहा 15 किलो गहू किंवा तांदूळ दिला जाईल. दारिद्य्ररेषेखालील (बीपीएल) दरानुसार गहू आणि तांदूळ मिळणार आहे. हा दर गव्हासाठी प्रतिकिलो 4.15 रूपये तर तांदळासाठी 5.65 रूपये इतका आहे. एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्याकांमधील ओबीसी विद्यार्थ्यांचे प्रमाण दोन-तृतीयांश इतक्‍या असणाऱ्या सरकारी किंवा खासगी वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांनाही या निर्णयाचा लाभ होईल. अशा वसतिगृहांमधील सर्वसाधारण वर्गातील विद्यार्थ्यांनाही अनुदानित अन्नधान्य मिळेल. मुलींच्या सर्व वसतिगृहांतही या निर्णयाची अंमलबजावणी होईल. अनुदानित गहू आणि तांदूळ पुरवण्यासाठी येणाऱ्या सर्व खर्चाचा भार केंद्र सरकार उचलणार आहे.

संबंधित योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी लाभार्थींची यादी लवकरात लवकर देण्याचे आवाहन पासवान यांनी राज्यांना केले. या योजनेतील अनुदानापोटी केंद्र सरकारवर सुमारे 4 हजार कोटी रूपयांचा बोजा पडण्याची शक्‍यता आहे. लवकरच काही राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक समोर ठेऊन सर्वच राजकीय पक्ष दलित आणि इतर मागास वर्गांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. यापार्श्‍वभूमीवरच केंद्र सरकारने संबंधित निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)